May 2021 : मे महिना महामारीचा सर्वात ‘घातक’ ! 71 लाखांपेक्षा जास्त रूग्ण आढळले, मृत्यूचे आकडे भितीदायक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग गेल्या काही दिवसांच्या तुलनेने कमी झाल्याचे दिसत आहे. यापूर्वी देशभरात दररोज 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. त्यामुळेच आता मे महिना हा सर्वात घातक महिना मानला जात आहे. गेल्या 21 दिवसांत देशात 70 लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.

गेल्या शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 70 लाख पार गेला होता. या महिन्यात आत्तापर्यंत 71.9 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. यादरम्यान 83,135 जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. गेल्या एप्रिल महिन्यात हा आकडा 48,768 वर गेला होता. यादरम्यान एकूण 69.4 लाख प्रकरणे समोर आली होती. गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या या महामारीत एकूण प्रकरणांत 27 टक्क्यांचा हिस्सा फक्त मे महिन्यात मिळाला.

पहिल्या लाटेच्या तुलनेत परिस्थिती दुपटीने बिकट

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत 26.2 लाख नवे रुग्ण आढळले होते. तर 33.3 हजार मृतांचा आकडा होता. ऑगस्ट 2020 मध्ये 19.9 लाख नवी प्रकरणे समोर आली होती. त्यामध्ये 28.9 हजारांवर रुग्णसंख्या पोहोचली होती. पण आता मे महिन्यात आत्तापर्यंत सरासरीनुसार दररोज 4 हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामध्ये जुना आकड्याचाही समावेश आहे.