ज्ञानश्री फाउंडेशनकडून भुकेलेल्यांसाठी मायेचा घास

पोलीसनामा ऑनलाइन – कोविड १९ च्या जागतिक महामारीच्या काळात बेघर, गरजू आणि गरीब लोकांसाठी ज्ञानश्री फाउंडेशनकडून पुण्यातील झेड ब्रिजच्याखाली नदीपात्र येतील गोरगरिबांसाठी शिजवलेल्या अन्नाचे डब्बे त्याच बरोबर मास्कचे वाटप सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर व ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जोहरभाई चुनावाला यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी सोनम पाटील, अमर काळे, राजेंद्र दीक्षित, सुनील महाजन हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सपोआ बाबर म्हणाले की, जागतिक महामारीच्या काळात बेघर, गरजू आणि गरीब लोकांना एकवेळ देखील लोकांना अन्नाची भ्रांत पडत आहे. अशा काळात ज्ञानश्री फाउंडेशनकडून भुकेल्यांसाठी मायेचा घास देण्यात आला. १०० हुन जास्त गरजूंना शिजवलेल्या अन्नाचे डब्बे व मास्क देण्यात आले. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

चुनावाला म्हणाले की ज्ञानश्री फाउंडेशनकडून आगामी काळात देखील शहराच्या विविध भागात गरजू लोकांना अन्न पुराव्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्याच बरोबर विविध समाजहिताचे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर काळे यांनी केले आणि आभार सोनम पाटील यांनी मानले.