मायावती, अखिलेश यांचा रिमोट कन्ट्रोल मोदींजवळ : राहुल गांधींची टीका

बाराबंकी : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथील रामनगर येथे सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी अखिलेश यादव आणि मायावतींवर जोरदार हल्लाबोल केला. मायावती आणि अखिलेश यादव यांचा रिमोट कंट्रोल नरेंद्र मोदींच्या हातात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

मायावती आणि अखिलेश यांच्याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘मायावती आणि अखिलेश यादव यांचा रिमोट कंट्रोल नरेंद्र मोदींच्या हातात आहे. मायावती आणि अखिलेश यांच्या राजकीय कारभाराचा इतिहास मोदींकडे आहे. मात्र, माझा असा कुठलाही इतिहास नाही त्यामुळेच मी मोदींविरोधात बोलण्यास घाबरत नाही उलट मोदीच मला घाबरतात. मोदी माझ्यावर दबाव टाकू शकत नाहीत मात्र, मायावती आणि अखिलेश यांनाच ते घाबरवू शकतात.’

आमचे सरकार सत्तेत आले तर देशाच्या प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात आम्ही दरवर्षी ७२ हजार रुपये टाकणार आहोत त्याचबरोबर कर्जाची परतफेड न करु शकणाऱ्या शेतकऱ्यांनाही आम्ही तुरुंगात टाकणार नाही, असे आश्वासन यावेळी राहुल यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात महाआघाडीची झाली आहे तर काँग्रेस स्वबळावर सर्व जागा लढवत आहेत.