Mayilsamy | टॉलीवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते मायलसामी यांचे वयाच्या 57 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mayilsamy | टॉलीवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते मायलसामी यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. चेन्नई येथील मायलसामी यांच्या राहत्या घरीच तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधी त्यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेची माहिती अभिनेता रमेश बाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. (Mayilsamy)

 

सध्या मायलसामी यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर अनेक कलाकार सोशल मीडियावर मायलसामी यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेता रमेश खन्ना, मनो बाला यांच्यासह अनेक चाहत्यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. मायलसामी यांच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर त्यांनी तमिळ अभिनेता विवेक आणि वडिवेलूसह अनेक विनोदी कलाकारांसोबत 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे.(Mayilsamy)

 

2011 मध्ये आलेला कंचना, 2015 मधील वेदालम, 2004 मधील गिल्ली, 2014 मधील विरम, 2015 मधील कंचना 2आणि 2018 मधील कसू मेला कसू यासह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका देखील साकारली होती.
तर मायलसामी यांनी 2001 मध्ये विरुगंबक्कम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती.
मायलसामी यांनी चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही शो मध्ये देखील सहभाग नोंदवला होता. आज त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Mayilsamy | famous comedian myilasamy passed away due to heart attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhumi Pednekar | भूमीच्या ‘त्या’ लूकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले – ‘कोणीतरी हिला चांगला डिझाईनर द्या….’

Pune News | कैद्यांना नातेवाईकांशी महिन्यातून 3 वेळा बोलता येणार, कारागृह प्रशासनाचा निर्णय

Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन