Mayor Kishori Pednekar | पोलखोल ! ‘उद्यानास टिपू सुलतान नाव देण्यास भाजपचा विरोध, पण पूर्वी BJPनेच दिला होता होकार’

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या गोवंडी परिसरातील एका उद्यानाच्या नामांतरावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. मुंबई पूर्व उपनगरातील समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी (Corporator Ruksana Siddiqui) यांनी गोवंडीतील महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) याचे नाव देण्याची मागणी केलीय. मात्र, या मागणीला भारतीय जनता पक्षाने (BJP) तीव्र विरोध दर्शविला आहे. याचबरोबर भाजपने शिवसेनेच्या (Shiv Sena) हिंदुत्वावर सुद्धा सवाल खडे केलेत. परंतु, यावरून मुंबईच्या शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाजपवर (BJP) पलटवार केला आहे.

त्यावेळी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) म्हणाल्या,
‘शिवसेनेला भाजप उगाच बदनाम करु पाहत आहे.
खरं तर गोवंडीत बाजीप्रभू देशपांडे मार्ग ते रफीक लनाल्यापर्यंतच्या मार्गाला 2013 मध्ये माजी नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी टिपू सुलतान नाव देण्याची मागणी केली होती.
इतकंच नाही तर 2013 मध्ये या प्रस्तावाला भाजपच्या सदस्याकडून मंजुरी देत पाठिंबा देखील देण्यात आला होता.
असं पेडणेकर यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे भाजपनं?

भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज कोटक (MP Manoj Kotak) यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर सवाल करत, त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
त्यावेळी ते म्हणाले, ‘जेव्हा मी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे ठेवले पाहिजे.याबाबत प्रस्ताव दिला होता.
त्यावेळी शिवसेनेच्या खासदाराने या उड्डाणपुलास सूफी संत ‘सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोइनुद्दीन सुफी चिश्ती-अजमेरी) असं नाव देण्यास म्हणाले होते.
आता गोवंडी येथील उद्यानास ‘टिपू सुलतान’ असं नाव देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. यामधून असं दिसून येतं की शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेलीय.
दरम्यान, पुढे ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीचा भाग बनल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध राहिला नाही आहे.
यातून शिवसेनेची लाचारी स्पष्टपणे दिसून येते.
अशी जोरदार टीका त्यांनी केली होती.

Web Title : Mayor Kishori Pednekar | bmc mayor kishori pednekar expose bjp over allegation on naming of tipu sultana govandi garden

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, स्वस्त सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

Personal Loan | तुम्हाला सुद्धा पैशांची गरज आहे का? इथं मिळेल मिनिटात 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या

Miraj Shivsena Chief Arrested | 20 लाखाच्या चेक चोरी प्रकरणात शिवसेना शहर प्रमुख गजाआड, शहरात खळबळ