Homeताज्या बातम्याMayor Muralidhar Mohol | महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस ! मुरलीधर मोहोळांवर...

Mayor Muralidhar Mohol | महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस ! मुरलीधर मोहोळांवर रक्तदानरुपी शुभेच्छांचा वर्षाव, 3860 जणांकडून रक्तदान; लेकीसह महापौरांकडून ‘महादान’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील रक्त पिशव्यांचा तुटवडा लक्षात घेता महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol ) यांनी वाढदिवसदिनी रक्तदान महासंकल्प (Blood Donation Camp) दिवस आयोजित करत पुणेकरांना रक्तदान करुन शुभेच्छा देण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या या आवाहनावर रक्तदानासाठी पुणेकर एकवटल्याचे चित्र दिसले. वाढदिवसदिनी दिवसभरात तब्बल ३ हजार ८६० रक्तदात्यांनी महापौरांना (Mayor Muralidhar Mohol ) रक्तदानरुपी शुभेच्छा दिल्या.

 

महापौर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात पुणेकरांना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शिबिरात विविध १९ रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या.
यावेळी या शिबिराला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे,आमदार भीमराव तापकीर,
आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,मनसे शहराध्यक्ष वसंतजी मोरे,आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह नगरसेवक,
भाजप पक्षपदाधिकारी, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

 

रक्तदानाच्या आवाहनाला पुणेकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) म्हणाले, ‘पुणेकर एकत्र आले तर काय करु शकतात?
हे कोरोना संकटाचा सामना करताना दिसून आले होते.
सद्यस्थितीत शहरात रक्ताचा तुटवडा असताना पुणेकरांनी रक्तदानासाठी दाखवलेली एकजूट समाधान देणारी होती.
३ हजार ८०० पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदानरुपी दिलेल्या शुभेच्छा नजीकच्या गरजूंना जीवनदान देणाऱ्या ठरणाऱ्या आहेत.
रक्तदान करणाऱ्या सर्व पुणेकरांचा मी ऋणी आहे. अनेकांना इच्छा असूनही वैद्यकीय कारणांनी रक्तदान करता आले नाही.
त्यांनी प्रत्यक्ष उपक्रमाला भेट देऊन दिलेल्या शुभेच्छाही महत्त्वाच्या होत्या.

 

शिबिराच्या आयोजनाबद्दल माहिती देताना संस्कृती प्रतिष्ठानचे सचिव निलेश कोंढाळकर म्हणाले, ‘रक्तदानाच्या आवाहनानंतर रक्तदात्यांचा प्रतिसाद लक्षात घेता रक्तपेढ्यांची संख्या १९ पर्यंत वाढवण्यात आली. रक्तदान प्रक्रियेत सुलभता ठेऊन कमी वेळात जास्तीत जास्त दात्यांना सहभागी होता येईल, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले.
त्यामुळेच दात्यांची संख्या ३ हजार ८०० पेक्षा जास्त झाली’

 

रक्तदानाचा उपक्रम लोकोपयोगी : चंद्रकांत पाटील

 

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच सेवा उपक्रमावर भर देण्याचा आग्रह धरतात.
त्यालाच अनुसरून मुरलीधर यांनी वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको रक्तदान करा, असे आवाहन केले.
त्या आवाहनाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आण्णांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल, त्यांचे भाजपा परिवाराच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन.‌
भविष्यातदेखील त्यांनी असेच लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, यासाठी शुभेच्छा, अशी भावना यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली.

 

लेकीसह महापौरांकडून रक्तदान !

 

रक्तदान शिबिराची सुरुवात महापौर मुरलीधर मोहोळ यांची कन्या सिद्धी हिच्या आणि स्वतः महापौरांच्या रक्तदानाने करण्यात आली.
त्यानंतर दिवसभर रक्तदात्यांनी रक्तदान करत महापौरांना शुभेच्छा दिल्या. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या रक्तदानाची सांगता रात्री १०:३० वाजता करण्यात आली.

 

Web Title : Mayor Muralidhar Mohol | Mayor’s decision to donate blood fulfilled by Punekars! Blood donation in the form of blood donation on Muralidhar Mohol, blood donation from 3860 people; blood donation from the mayor along with her daughter !

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sukesh Chandrasekhar Extortion Case | 200 कोटी वसुली प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी 2 सुपरस्टार ईडीच्या रडारवर

Param Bir Singh | परमबीर सिंग यांना मुंबईतील कोर्टाचा मोठा धक्का ! न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Pune Treasury Office | निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News