Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mayor Murlidhar Mohol | शिवजयंती उत्साहात (Shivjayanti 2022) साजरी करण्याबाबत कुणाचेच दुमत नाही. उत्सवात महापालिकेच्या (Pune Corporation) वतीने सर्व सहकार्य राहील. सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तातडीने राज्य शासनाला (Maharashtra Government) कळवून मिरवणुकीची परवानगी द्यावी (Permission To Rally) अशी मागणी करणार असे आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिले.

 

शिवजयंती तयारी निमित्त महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवन (Pune Mahapalika Bhavan) येथे समन्वय बैठक झाली. याप्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve), विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ (Dipali Dhumal) आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

 

महापौर मोहोळ म्हणाले की , मागील दोन वर्षे कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिवजयंती, गणेशोत्सव आदी उत्सव आपण संयम आणि उत्साहात साजरी केली गेली. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहे. राज्य शासनाने अद्याप गर्दीबाबतचे नवीन आदेश दिलेले नाहीत. येत्या काही दिवसांत ते येतील. त्यानुसार आपण शिवजयंती उत्सव साजरा करूयात. सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

 

शिवजयंती उत्सवामध्ये मिरवणुकीला परवानगी देणार असाल तर शिवाजी रस्त्यावर सध्या सुरू असलेले काम थांबवावे. पोलीस ठाण्यात मंडळांचे अर्ज स्वीकारून तातडीने परवानगी द्यावी. किंवा ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था निर्माण करावी. शिवजयंती निमित्त शाळांमध्ये स्पर्धा आयोजित कराव्यात. राजकीय सभा आंदोलनांना परवानगी दिली जाते मग मिरवणुकीला का नाही ? ही बाब सरकार पर्यंत पोहोचवावी. राज्य शासनाने सार्वजनिक उत्सवांवरील खर्चाला मर्यादा आणली आहे, त्यामुळे महापालिका खर्च करू शकत नाही. यामुळे पालिकेला स्वत:च रथ व मूर्ती देखील दुसऱ्यांकडून घ्यावी लागते. यासारखे दुर्दैव कोणते, असा मुद्दाही कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महापालिका आयुक्त म्हणाले, की सरकारच्या गाईड लाईन्स एक दोन दिवसांत येणार आहेत.
त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. उत्सवासाठी रस्ते, पाण्याची व्यवस्था , शालेय स्पर्धा आयोजन याबाबत आजच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

 

रविंद्र शिसवे म्हणाले, मागील दोन वर्षे कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी संयम पाळला, त्यांचे आभारी आहोत.
महापौर जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा राहील.
त्यानुसारच उत्सव साजरा करण्याबाबतचा अहवाल सरकारला पाठवू.
परंतु शासनाकडून काय नियम येतील त्यानुसार आम्ही अंमलबजावणी करू.
शिवजयंती उत्सवाला पोलिसांचे सहकार्य राहील.

 

Web Title :- Mayor Murlidhar Mohol | Maharashtra Government should allow procession on Shivjayanti Mayor Muralidhar Mohol

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा