Mayor Murlidhar Mohol | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’ ! मोहोळ ठरले भारतातील महानगरातील सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे महापौर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांच्या शिरपेचात सोशल मीडियावर (Social Media) मानाचा तुरा रोवला गेला असून महापौर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी ट्विटरवर एक लाख फॉलोअर्सचा (twitter followers) टप्पा ओलांडला आहे. या टप्प्यासह महापौर मोहोळ भारतातील महानगरातील ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय महापौर झाले असून त्यांना सर्वाधिक फॉलोअर्स असल्याची नोंद झाली आहे. लोकसंवादासाठी महापौर मोहोळ यांचा ट्विटरचे व्यासपीठ महत्त्वाचे ठरले आहे.

 

मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे सुरु केला. त्यात फेसबुक (Facebook) , इन्स्टाग्रामचाही (Instagram) समावेश असला तरी त्यांना ट्विटवर (twitter) कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे. विशेष म्हणजे पुण्यासह महापौर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांना देशभरातून फॉलोअर्स मिळाले आहेत. त्यातही सर्वपक्षीय फॉलोअर्स असणे, ही महापौर मोहोळ यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. देशातील महानगरात महापौर मोहोळ सर्वाधिक लोकप्रिय असताना त्यांच्या पाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांचा क्रमांक आहे. मात्र त्यातही पेडणेकर यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स मोहोळ यांना मिळाले.

ट्विटरवरील यशाबद्दल माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘जनसंवादाची पारंपरिक माध्यमे काहीशी मागे पडत असताना सोशल मीडिया हे थेट नागरिकांशी संवाद साधण्याचे प्रभागी माध्यम आहे. माझ्याकडे महापौरपदाची जबाबदारी आल्यावर प्रत्यक्ष फिल्डवर काम करतानाच या माध्यमाचा वापर करण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकानीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पुण्यासारख्या महानगराचे नेतृत्व करत असताना नागरिकांकडून ट्विटवर नव्या कल्पना, सूचना, समस्या याची थेट माहिती मिळत राहिली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला’.

 

समाज माध्यमांच्या जाणकार सायली नलवडे या बाबतीत माहिती देताना म्हणाल्या, महापौरांना ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळण्याचे कारण म्हणजे त्यांच्या ट्विटर हँडलबद्दल असलेली विश्वासार्हता आणि संवाद कौशल्य. कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या काळात महापौर मोहोळ यांना अधिकाधिक फॉलोअर्स जोडले गेले. कोरोनाची दैनंदिन आकडेवारी, कोरोनासंदर्भात फिल्डवर उतरून केलेल्या उपाययोजना, बेड्सची उपलब्धता आणि त्यानंतर लसीकरणाची माहिती त्यांच्या ट्विटरवरुन दैनंदिन दिली जात आहे. शिवाय नागरिकांच्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे. महापौरांचे ट्विटर हँडल एकेरी नाही तर दुहेरी संवादाचे माध्यम असल्यानेही फॉलोअर्सची संख्या अधिक दिसते’.

 

महानगर/महापौर/ट्विटर फॉलोअर्स

१) पुणे – मुरलीधर मोहोळ/१ लाख +

२) मुंबई – किशोरी पेडणेकर/४९ हजार+

३) हैदराबाद – विजयालक्ष्मी गडवाल/२३ हजार+

४) आग्रा – नवीनकुमार जैन/९ हजार +

५) सुरत – हेमाली बोघावाला/८ हजार+

६) अहमदाबाद – कीर्तीकुमार परमार/४ हजार+

(निवडलेली शहरे १० लाखपेक्षा अधिक लोकसंख्येची)

(माहिती संकलन : सहस्रजिथ क्रिएशन्स, पुणे)

 

Web Title :- Mayor Murlidhar Mohol | Pune Mayor Muralidhar Mohol becomes ‘Lakhpati’ on Twitter! Mohol became the mayor with the highest number of Twitter followers in the Indian metropolis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Babanrao Gholap | चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर भर कार्यक्रमात फेकली काळी शाई

Madhavi Gogate | ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं 58 व्या वर्षी मुंबईत निधन

IND Vs NZ Test Series | न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूनं दिला इशारा; म्हणाला – ‘अश्विन-अक्षरसाठी प्लॅन रेडी