महापौर वाकळे विधानसभेसाठी इच्छुक, सेनेच्या राठोड यांच्या अस्वस्थतेत भर, भाजपने एबी फॉर्म दिला ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यानंतर महापालिकेत पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याने शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या अस्वस्थतेत भर पडली आहे. अगोदरच माजी खा. गांधी यांच्यासोबत तोडगा निघत नसल्याने ते अस्वस्थ आहेत.

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यातच आज भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. अहमदनगर महापालिकेत भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने महापौर पद मिळाले आहे. महापालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजप आणि शिवसेनेत शहरात अजिबात सख्य नाही. तसेच माजी खासदार दिलीप गांधी यांचा शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांना तीव्र विरोध आहे. त्यातच आज वाकळे यांनी उमेदवारी अर्ज नेल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

दुपारी महापालिकेत महापौर वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या भाजपच्या सर्व नगरसेवकांची एक बैठक झाली. यात पक्षाचा आदेश येईपर्यंत वाट पाहणे, जो आदेश असेल. त्याप्रमाणे कार्यवाही करणे, अशी भावना सर्व नगरसेवकांनी मांडली. सूत्रांच्या माहितीनुसार बाबासाहेब वाकळे यांना भारतीय जनता पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म आला असून, पक्ष सांगेल तेव्हा आपण अर्ज भरू, असे बाबासाहेब वाकळे यांनी स्पष्ट केले आहे.

Visit : Policenama.com