मोरगावच्या गणपतीला ‘मोरेश्वर’ नाव कसे पडले ? काय आहे मंदिराची कथा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – गणपती बाप्पा मोरया ! गणपती बाप्पाचं आगमन झालं की, बाळ-गोपाळांचा कल्लोळ युवकांचा जल्लोष, आरतीचा सोहळा, प्रसादासाठीची लगबग आणि आनंदाने गजबजलेलं संपू्र्ण महाराष्ट्राचं वातावरण अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. या गणपतीला मयुरेश्वर म्हणूनही ओळखतात. या गणपतीचं नाव मोरेश्वर का पडलं याची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय मोरगावच्या मोरेश्वर मंदिराची कहाणीही आपण जाणून घेणार आहोत.

image.png

गणकी नगरीचा राजा चक्रपाणीचा सुपुत्र सिंधू याने सुर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला होता. यामुळे तो अहंकारी झाला. यानंतर तो देव-देवतांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्राचा पराभव करून स्वर्गावरही ताबा मिळवला. हे पाहिल्यानंतर भगवान विष्णुंनी त्याला युद्धाचं आवाहन दिलं. सिंधूने त्यांचाही पराभव केला.

image.png

सर्व देवांना गणकीवासात टाकत सिंधूने सत्यलोक आणि कैलासावर स्वारी करण्याचं ठरवलं. यानंतर देवतांनी एकत्र येत गणेशाची आराधना केली. यानंत गणेशाने त्यांना मदत करण्याचं वचन दिलं. यानंतर गणेशाने सिंधूवर चाल केली. दोघांचे जोरदार युद्ध झाले. गणेश एका मोरावर बसून युद्ध करत होते. गणेशाने सिंधूचा वध करत त्याच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकून दिले.

image.png

सिंधून डोके ज्याठिकाणी पडले त्याला मोरगाव म्हणतात. कारण मोरावर बसून गणपती बाप्पांनी दैत्यसंहार केला होता. येथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मुर्तीची स्थापना केली होती. हा अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर. या गावात मोरांची संख्याही जास्त आहे त्यामुळे याला मोरगाव म्हणतात. थोर गणेश भक्त मोरया गोसावी यांनी तेथील पूजेचा वसा घेतला होता. मोरेश्वराचे हे स्वयंभू व अद्यस्थान आहे.

image.png

मंदिरासमोर आहे नंदीची मुर्ती 

सुखकर्ता दुखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात बसून रचली होती असे म्हटले जाते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरासमोर एक नंदीची मुर्ती आहे. असे सांगितले जाते की, शंकराच्या मंदिरासाठी एका रथातून नंदीची मुर्ती नेली जात होती. मात्र येथे येताच रथाचे चाक तुटले. त्यामुळे हा नंदी येथेच ठेवण्यात आला.

image.png

मोरगावला कसे जाल ?
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव वसलेला आहे. बारामतीपासून केवळ 35 किमीचा प्रवास करून तुम्ही मोरगावला दर्शनासाठी जाऊ शकता. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा मोरगाव पासून 17 किमी अंतरावर आहे. मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोयही उपलब्ध आहे.

image.png

मंदिराबदद्ल थोडक्यात काही…
मंदिरात गेल्यानंतर अद्भुत प्रसन्नात जाणवते. मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत मनमोहक हिरे बसवलेले आहेत. तुम्हाला मंदिरावर डोळे दिपून टाकणारं नक्षीकाम  पहायला मिळेल. मंदिराच्या भोवती प्राचीन दगडी बुरुज आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like