वन नेशन-वन रेशन कार्ड : लॉन्च झालं ‘मेरा रेशन अ‍ॅप’ कोणतं देखील राज्य असू द्या, कोणत्या पण दुकानातून रेशन घेऊ शकतात ‘लाभार्थी’

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 13 मार्च 2021 – आता यापुढे प्रवासी कामगारांना सवलतीच्या दरात अन्य राज्यात रेशन खरेदी करण्यात त्रास होणार नाही. कारण आता ’वन नेशन-वन रेशन कार्ड’ सुरू केलं आहे. ’वन नेशन-वन रेशन कार्ड’ अंतर्गत लाभार्थी आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही राज्यात कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेऊ शकतात. यासाठी नवीन रेशन कार्डचीही गरज नाही. हे सुलभ करण्यासाठी सरकारने ‘माझं रेशन’ अ‍ॅप सुरू केलं आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सुरूवातीस ‘माझं रेशन/मेरा रेशन’ अ‍ॅप सुरू करताना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, हे अ‍ॅप स्थलांतरित कामगारांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. याद्वारे जेथे तो स्वत: ची नोंदणी करू शकतो. याद्वारे लाभार्थी त्यांची पात्रता किती आहे? हे शोधू शकतात. मागील सहा महिन्यांत कोणत्या दुकानातून लाभार्थ्याने किती रेशन घेतले आहे ?. याव्यतिरिक्त, हे अ‍ॅप लाभार्थीस त्याच्या आसपासच्या रेशन शॉपचा पत्ता देखील सांगेल.

‘एक राष्ट्र – एक रेशनकार्ड’शी कनेक्टेड 32 राज्ये :
तसेच सुधांशू पांडे म्हणाले की, या योजनेशी 32 राज्ये जोडली गेली आहेत. दिल्ली, पश्चिम बंगाल, आसाम आणि छत्तीसगड काही महिन्यांत जोडले जातील. ते पुढे म्हणाले की, दिल्लीतील सर्व रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत. रेशन कार्ड पोर्टेबिलिटीबद्दल माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, कोरोना काळाच्या दरम्यान दीड कोटी लाभार्थ्यांनी इतरत्र रेशन घेतले आहे. तर कोरोनापूर्वी केवळ 12 राज्ये या योजनेशी संबंधित होती, परंतु सध्या ही संख्या 32 आहे.