TV च्या ‘शनाया’चे ‘हॉट’ फोटो सोशलवर ‘व्हायरल’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड असो वा मराठी फिल्म इंडस्ट्री, कोणतीही अभिनयाचाी पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या बळावर अभिनय क्षेत्रात येऊन आपलं स्थान निर्माण करणारे कलाकार खूप कमी आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे ईशा केसकर. रंगमंचापासून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या ईशा केसकरचं लहान पडद्यावर आणि मराठी सिनेमातही खूप नाव झालं आहे. सध्या आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे ईशा चर्चेत आली आहे. ईशाचे अनेक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

ठरवून अभिनय क्षेत्राकडे वळणाऱ्या ईशाचा जन्म 11 नोव्हेंबर 1991 रोजी पुण्यात झाला आहे. मानशास्त्रात पदवीचे शिक्षण सुरू असताना ईशानं नाटकाकडे पाऊल वळवलं. एका क्षणात तिनं अभिनयात जाण्याचं ठरवलं. पुरुषोत्तम करंडक, सवाई एकांकिका अशा अनेक स्पर्धा करत ती अभिनेत्री म्हणून आपली ओळख तयार करू लागली.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती शनाया ची भूमिका साकारत आहे जी प्रेक्षकांमध्ये खूपच फेमस आहे. 2013 साली आलेल्या वि आर ऑन होऊन जाऊ द्या या सिनेमातून तिनं आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेंड सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. मंगलाष्टक वन्स मोअर या सिनेमातही तिनं काम केलं आहे. झी मराठीच्या जय मल्हार या मालिकेमुळं ईशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिची बानू ची भूमिका सर्वांनाच आवडते.

View this post on Instagram

Fake or Candid? #ishakeskar

A post shared by Isha ‘BLUE’ Keskar (@ishackeskar) on

You might also like