सीनियर डॉक्टरचा ‘डर्टी पिक्चर’, ‘इंटर्न’ डॉक्टरचे लैंगिक शोषण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच वाशी येथील म्यूनिसिपल कॉलेजच्या सीनियर डॉटरने एका इंटर्नचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री पीडीत तरुणीला डॉक्टरने पार्कमध्ये बोलावून तिला बिअर पाजून लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

पीडित विद्यार्थिनी नेरुळ येथील एका वैद्यकिय कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घेते. तसेच ती वाशी येथील म्यूनिसिपल कॉलेजमध्ये इंटर्न म्हणून काम करते. तरुणीने पोलिसांना दिलेल्या फिर्य़ादेत म्हटले आहे की, २५ मे रोजी मध्यरात्री डॉक्टरने महत्वाचे काम असल्याचे सांगून आपल्यासोबत घेऊ गेले. डॉक्टरने हॉस्पिटलच्या पाठिमागे असलेल्या पार्कमध्ये घेऊन गेले. याठिकाणी बळजबरीने बिअर पाजली.

बिअर पाजल्यानंतर त्याने जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने डॉक्टरला धक्का देऊन तेथून पळून गेली. यानंतर सकाळी तिने घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने डॉक्टर विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यास सांगितल्याने तिने तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.