एमबीबीएस डॉक्टरांना आयएएस होण्यासाठी ब्रीजकोर्स हवा : पंतप्रधानांना पत्र

पोलीसनामा ऑनलाइन – डेंटिस्ट डॉक्टरांना फॅमिली फिजीशयनची प्रॅक्टिस करण्यासाठी ब्रीजकोर्स आणण्याचा वादग्रस्त निर्णय घेण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे. या निर्णयाला डॉक्टरांचा विरोध असून अशाप्रकारे ब्रीजकोर्सद्वारे डेंटिस्ट डॉक्टर फिजीशन होणार असतील तर एमबीबीएस डॉक्टरांना आयएएस होण्यासाठीही ब्रीजकोर्स तयार करा, अशी खिल्ली एमबीबीएस डॉक्टरांनी उडवली आहे. अशा प्रकारची मागणी करणारे पत्रच डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

आयएएस नसणारे मोदी सरकारच्या काळात केंद्रीय सचिव म्हणून काम पहात आहेत. नुकतेच आयएएस नसणाऱ्या नऊ जणांची केंद्र सरकारने नियुक्ती करून वाद निर्माण केला आहे. एकुणच संरचना बदलून मनमानी करणाऱ्या मोदी सरकारमुळे आता एमबीबीएस डॉक्टरही हतबल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. रितेश शर्मा यांनी पत्र लिहिले असून या पत्रात मागणी केली आहे की, एमबीबीएम डॉक्टरांना आयएएस बनण्यासाठी एक ब्रीजकोर्स सुरू करावा. डॉ. शर्मा यांनी या मागणीसाठी एक मोहीमदेखील सुरु केली आहे.

डॉ. शर्मा यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्याथ्र्यांना ब्रीजकोर्सद्वारे व्यवस्थापन प्रशिक्षण मिळावे. जेणेकरून या माध्यमातून हे डॉक्टर आयएएस बनतील आणि याचा फायदा भारतात चांगल्या पद्धतीने आरोग्यसेवेचे व्यवस्थापन करता येईल. आपल्या देशात अजूनही अनेक ठिकाणी आरोग्यसुविधा पोहोचत नाहीत. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे फार आवश्यक आहे.

जर प्रशासनात एखादा एखादा आयएएस ऑफीसर डॉक्टर असेल तर ज्या ठिकाणी आरोग्यसुविधा मिळत नाहीत अशा ठिकाणी त्या मिळण्यास मदत होईल. नवीन आजार किंवा आरोग्यक्षेत्राची अधिक माहिती ही एखाद्या डॉक्टरला चांगल्या पद्धतीने कळू शकते. त्यामुळे त्याविषयी कोणती धोरणे बनवायची हा निर्णय डॉक्टर योग्यरित्या घेऊ शकतो. याचसाठी मी एमबीबीएम डॉक्टरांना आयएएस बनण्यासाठी एखादा ब्रीजकोर्स असावा या आशयाचे पत्र पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे, असे डॉ. शर्मा यांनी म्हटले आहे. डेंटिस्ट डॉक्टरांना फॅमिली फिजीशयनची प्रॅक्टिस करण्यासाठीच्या ब्रीजकोर्सला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. जर सरकारने हा ब्रीजकोर्स लादला तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like