
MC Stan | रॅपर एमसी स्टॅन बॉलिवूड मध्ये येण्यासाठी सज्ज; साजिद-वाजिदकडून मिळाली ‘ही’ खास ऑफर
पोलीसनामा ऑनलाइन : MC Stan | ‘बिग बॉस 16’ मधून घराघरात पोहोचलेला पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन आज खूपच चर्चेत आहे. बिग बॉस 16 च्या यंदाच्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅनला आज अनेक ऑफर्स मिळत आहेत. एमसी स्टॅनने मराठमोळ्या शिव ठाकरेला टक्कर देत हे विजेते पद मिळवले होते. एमसी स्टॅनच्या विजयानंतर अनेकांनी त्यावर आक्षेप देखील नोंदवला होता. आता एमसी स्टॅन बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी देखील सज्ज झाला आहे. आज एमसी स्टॅनचे अनेक फॉलोवर्स आहेत. बिग बॉसच्या घरातील खेळीने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. लवकरच आता तो बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. (MC Stan)
गेल्या अनेक दिवसांपासून एमसी स्टॅन हा सोशल मीडियावर नवनवीन विक्रम रचताना दिसत होता. अनेक दिवसांपासून तो सोशल मीडियावर चर्चेत देखील होता.आता संगीतकार साजिद-वाजिदकडून स्टॅनला खास गाण्याची ऑफर मिळाली आहे. लवकरच स्टॅन गाण्याचे रेकॉर्डिंग ही करणार असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर एमसी स्टॅन हा हॉलीवुड मध्ये देखील काम करणार असल्याचे समोर आले आहे. एमसी स्टॅनने बिग बॉस जिंकत 31 लाखाचे बक्षीस मिळवले आहे. बिग बॉस मध्ये एमसी स्टॅन त्याच्या स्टाईल आणि बोलीमुळे खूपच चर्चेत होता. (MC Stan)
23 वर्षीय एमसी स्टॅनने आपल्या गाण्याने तरुणांना वेड लावले आहे. आज त्याची क्रेझ प्रत्येकामध्ये दिसत आहे.
एमसी स्टॅनचे प्रत्येक डायलॉग आज तरुणांच्या तोंडी ऐकायला मिळते.
तर स्टॅनने आपल्या खेळीने बिग बॉसच्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला होता.
त्याने बिग बॉसच्या घरात आपल्या खेळीने प्रेक्षकांची मने जिकली होती.
एमसी स्टॅन हा घरातील पॉप्युलर स्पर्धकांपैकी एक होता. एमसी स्टॅनचे फॅन फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात आहेत.
स्टॅनचा ’80 हजार के जूते’ हा डायलॉग तर सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला होता.
एमसी स्टॅन हा त्याच्या लक्झरी लाईफमुळे नेहमीच लाईम लाईट मध्ये असतो.
Web Title :- MC Stan | after bigg boss 16 mc stan entry bollywood hollywood industry know latest update
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेचा विनयभंग करत वडिलांना मारहाण, आरोपीला अटक; चाकण परिसरातील घटना