MC Stan | एमसी स्टॅनने केला ‘हा’ विक्रम; विराट कोहली आणि शाहरुख खानलाही टाकलं मागे

पोलीसनामा ऑनलाइन टीम : यंदाचा बिग बॉस 16 या पर्वाचा विजेता रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) ठरला. मराठमोळ्या शिव ठाकरेला मागे टाकत त्याने ही बाजी मारली. बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅनचे सर्वत्र अभिनंदन होताना दिसत आहे. तर अनेकांनी त्याच्या या विजयावर आक्षेप देखील नोंदवला होता. बिग बॉस जिंकल्यानंतर स्टॅनने (MC Stan) आता सोशल मीडियावर एका मागून एक विक्रम रचले आहेत. नुकताच त्याने विराट कोहलीला मागे टाकले होते तर आता त्याने इंस्टाग्राम वर लाईव्ह येत किंग खान शाहरुखलाही मागे टाकले आहे.
History created. Now this is next level craze, all the previous records of #BiggBoss winner and Contestants have been broken. No one have ever touched 200K mark of live viwers and #MCStan has got 541K Live Viewers😱 pic.twitter.com/X5ZWXoQu8a
— The Khabri (@TheKhabriTweets) February 16, 2023
सोशल मीडियावर ज्या दिवशी बिग बॉस 16 वा पर्व एमसी स्टॅनने जिंकला त्या दिवशी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याच वेळेत विराट कोहलीने ही पोस्ट शेअर केली होती. एमसी स्टॅनने (MC Stan) बिग बॉसची ट्रॉफी घेतलेला फोटो पोस्ट केला होता. तर विराट कोहलीने पाकिस्तान संघाविरुद्ध भारतीय महिला संघाने विजय मिळवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. या दोन्ही पोस्ट एकाच वेळी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या होत्या. मात्र विराटने शेअर केलेल्या पोस्टवर 20 लाख लाईक मिळाले होते. तर एमसी स्टॅनने शेअर केलेल्या पोस्टवर 60 लाखाहून अधिक लाईक मिळाले होते.
आता काल रात्री 10 वाजता एमसी स्टॅन पहिल्यांदाच इन्स्टा लाईव्ह आला होता. यावेळी त्याने 10 मिनिटे इन्स्टा लाईव्ह केले. यावेळी त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये गाणे देखील गायले होते. यावेळी अनेक चाहते आणि सेलिब्रिटी देखील त्याच्या इन्स्टा लाईव्ह मध्ये सामील झाले होते. तर त्याच्या या लाईव्हने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
एमसी स्टॅनने यावेळी नवा विक्रम रचला आहे.
एमसी स्टॅन्ड लाईव्ह आल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात 541K पर्यंत त्याचे व्ह्यू पोहचले होते.
याचा अर्थ तो लाईव्ह असताना जवळपास 5 लाख 41 हजार लोक त्याला पाहत होते.
एमसी स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी आहे ज्याच्या इन्स्टा लाईव्हला एवढ्या लोकांनी हजेरी लावली होती.
शाहरुख खानच्या इन्स्टा लाईव्हवर 255K व्ह्यूज आले आहेत.
मात्र आता स्टॅनने त्याचेही विक्रम मोडत नवा विक्रम रचला आहे.
त्याचे इन्स्टा लाइव्ह हे जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप 10 लाइव्हपैकी एक ठरले आहे.
या इंस्टा लाइव्हला क्रिस्टियानो रोनाल्डो, ड्रेक,
निकी मिनाज आणि बीटीएस मेंबर जंगकूक आणि तायह्युंग यांच्याकडून लाइक्स मिळाले आहेत.
आता एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता त्याने संपूर्ण भारतात दौऱ्याची घोषणा केली आहे. त्याच्या पॅन इंडिया टूरची घोषणा होताच मुंबई आणि पुण्याची तिकीट काही मिनिटातच विकली गेली आहेत.
Web Title :- MC Stan |bigg boss 16 winner mc stan insta live got 541 k views broke shahrukh khan record
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | घरी खेळायला आलेल्या ९ वर्षाच्या मुलीबरोबर मैत्रिणीच्या वडिलांचे अश्लिल चाळे