
MC Stan | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात
पोलीसनामा ऑनलाइन : बिग बॉस 16 चा विजेता रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) हा सध्या खूपच चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर एमसी स्टॅन अनेक विक्रम मोडताना दिसत आहे. त्याचे फॉलोवर्स देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. एमसी हा त्याच्या अनोख्या स्टाईल आणि बोली मुळे खूपच चर्चेत असतो. आता एमसी स्टॅन (MC Stan) त्याची गर्लफ्रेंड बूबा मुळे चर्चेत आला आहे. एमसी स्टॅनने एका मुलाखतीत लवकरच बूबा सोबत लग्न गाठ बांधणार असल्याचे सांगितले आहे. आता त्याच्या या वक्तव्यानंतर बूबा नक्की कोण आहे याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
बिग बॉसच्या घरात देखील स्टॅनने अनेकदा बूबाचे नाव घेतले होते. एवढेच नाही तर फॅमिली वीक मध्ये एमसी स्टॅनची आई जेव्हा बिग बॉसच्या घरात आली त्यावेळी त्यांनी देखील “स्टॅन लवकरच बूबा सोबत लग्न करणार आहे” असे सांगितले होते. आता अनेकांच्या हृदयावर राज्य करणारा एमसी स्टॅन लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याने चाहते देखील आनंदित झाल्याचे दिसत आहे.
एमसी स्टॅन (MC Stan) हा गर्लफ्रेंडला बूबा या नावाने हाक मारतो, तिचे खरे नाव अनम शेख आहे. तर या दोघांची लव स्टोरी खूपच फिल्मी आहे. बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅनने अर्चना गौतम आणि सौंदर्य शर्माला त्यांची ही लव स्टोरी सांगितली होती. यावेळी स्टॅन म्हणाला होता, “माझं बूबावर खूप प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचे होते त्यामुळे मी 30 ते 40 लोकांना घेऊन बूबाच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेलो आणि यावेळी तिच्या घरच्यांना सांगितले आमच्या लग्नाला परवानगी द्या नाहीतर मी तिला पळवून घेऊन जाईल”. बूबा ही एमसी स्टॅनची दुसरी गर्लफ्रेंड आहे. याआधी तो औझमा शेखसोबत रिलेशनशिप मध्ये होता. औझमा शेख बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर औझमाने एमसी स्टॅनवर अनेक आरोप केले होते. या आरोपांमुळे एमसी स्टॅन अनेकदा अडचणीत सापडला होता.
सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे बूबा बरोबर लग्न करण्याआधी एमसी स्टॅनने तिला अट देखील घातली होती.
एमसी स्टॅनला त्याचे आई-वडील सर्वस्व आहेत. आई-वडिलांना दुःख होईल अशी कोणतीच गोष्ट करायला
त्याला आवडत नाही. त्यामुळे लग्नानंतर आई वडिलांना त्रास न देण्याची, त्यांची काळजी घेण्याची आणि भांडण
न करण्याची अट त्याने बूबाला घातली आहे.
Web Title :- MC Stan | bigg boss 16 winner mc stan wedding know about mc stan girlfriend buba details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update