MC Stan | ‘बिग बॉस’ फेम एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन : MC Stan | यंदाचा हिंदी बिग बॉस 16 चे विजेतेपद पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने पटकावले. त्यानंतर तो खूपच चर्चेत आला. त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. बिग बॉस नंतर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहेत. नुकताच त्याचा एक कॉन्सर्ट दरम्यानचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनत आहे. (MC Stan)

बिग बॉस हिंदीचा विजेता ठरल्यानंतर स्टॅनने चाहत्यांसाठी भारत दौरा आयोजित केला होता. त्याच दरम्यान शुक्रवारी 10 मार्चला हैदराबाद येथे एमसी स्टॅनचा कॉन्सर्ट पार पडला. याच कॉन्सर्ट मधील एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी कॉन्सर्टला हैदराबाद मधील एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. एमसी स्टॅन स्टेजवर गात असताना गर्दीतून एक पाण्याची बाटली त्याच्याकडे फेकण्यात आली. सुदैवाने ती बाटली त्याच्या बाजूला पडली आणि त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर लगेचच स्टॅनने हैदराबाद मधील कॉन्सर्ट रद्द केले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. (MC Stan)

https://www.instagram.com/reel/Cpn5nc6hSpO/?utm_source=ig_web_copy_link

बिग बॉसचे विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनला अनेक ब्रँडकडून ऑफर देखील मिळाली आहे. सोशल मीडियावर त्याचे फॉलोवर्स देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिद यांच्याकडूनही त्याला गाण्याची ऑफर मिळाल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title : MC Stan | fans throw water bottle at mc stan during hyderabad concert video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Palghar Crime News | चुलत भावाच्या हळदीला आलेल्या पाहुण्यांना घरी सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

Satara Crime News | येणपेमध्ये रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

ED Arrest Vinay Aranha | पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हानाला ईडीकडून अटक; 20 मार्चपर्यंत ईडीची कोठडी