MCA Election | मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत चुरस, संदीप पाटील यांचे आशिष शेलार-पवारांना थेट आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत (MCA Election) मोठी उलथापालथ झाली आहे. भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात या निवडणुकीवरून युती झाली आहे. यानंतर आता माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी या राजकीय गटाला आव्हान देण्याचे ठरवले आहे. संदीप पाटील यांनी यापूर्वी शरद पवार गटाकडून अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला होता. मात्र काल पवार-शेलार युती झाल्यानंतर या राजकीय युतीला क्रिकेटपटूंनी (MCA Election) आव्हान द्यायचं ठरवलं आहे.

यानंतर संदीप पाटील यांनी आपण स्वतंत्र गटातर्फे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. MCA च्या राजकारणात पहिल्यांदाच शरद पवार-आशीष शेलार यांच्यात युती झाली. त्यानंतर काल माटुंग्यात संदीप पाटील यांनी स्वतंत्र गटाची घोषणा केली. मुंबई क्रिकेट ग्रुप (Mumbai Cricket Group) असे या गटाचे नाव असून त्याचे चिन्ह ही जाहीर करण्यात आले. शरद पवार गटातील उमेदवार, ज्यांना नव्या पवार-शेलार गटात स्थान मिळू शकले नाही, ते सर्व संदीप पाटील यांच्या मुंबई क्रिकेट गटात सामील होणार आहेत.

शेलार-पवार गटातर्फे आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला आहे.
त्यामुळे आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत (MCA Election) आशिष शेलार-संदीप पाटील
यांच्यात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. शेलार-पवार पॅनलतर्फे शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर
(Milind Narvekar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अपेक्स कौंसिलसाठी स्वतंत्र अर्ज भरला.
तर विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) यांनी एमपीएल म्हणजेच मुंबई प्रीमियर लीगसाठी
(Mumbai Premier League) अर्ज दाखल केला आहे. उपाध्यक्षपदाची निवडणूक अमोल काळे (Amol Kale)
हे लढवत आहेत. अशा रितीने विविध पक्षांचे नेते मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एका पॅनल द्वारे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- MCA Election | mca election former cricket player sandeep patil announces new panel in opposition of ashish shelar and sharad pawars political panel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा