×
Homeताज्या बातम्याMCA Elections 2022 | मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, क्रिकेटपटू विरुद्ध...

MCA Elections 2022 | मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेता रंगणार लढत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Elections 2022) अध्यक्षपदाची निवडणूक 20 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे भाजप (BJP) मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या क्लबकडून मतदान करणार आहेत. एमसीएच्या निवडणुकीसाठी (MCA Elections 2022) मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे आता आशिष शेलार यांच्या पायोनियर क्लबकडून (Pioneer Club) शरद पवार मतदान करतील हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत एक राजकीय नेता आणि माजी क्रिकेटर यांच्यात लढत रंगणार आहे. यामुळे हि लढत भाजपचे नेते आशिष शेलार विरुद्ध माजी क्रिकेटर संदीप पाटील (Sandeep Patil) यांच्यात होणार आहे.

 

एमसीएची ही बहुचर्चित निवडणूक मागील महिन्यात 28 सप्टेंबरला होणार होती. मात्र काही कारणांमुळे त्यादरम्यान निवडणूक न होता ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता हि निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाकडून माजी कसोटीपटू संदीप पाटील हे अध्यक्षपदाचे आणि नवीन शेट्टी (Naveen Shetty) हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार हेही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याने अध्यक्षपदासाठी संदीप पाटील आणि आशिष शेलार यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.

 

पवार गटाकडून सचिवपदासाठी अजिंक्य नाईक, संयुक्त सचिवपदासाठी गौरव पय्याडे आणि कोषाध्यक्षपदासाठी जगदीश आचरेकर हे उमेदवार असतील.
त्याशिवाय कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठीही पवार गटाकडून अभय हडप कौशिक गोडबोले, संदीप विचारे, प्रशांत सावंत, दाऊद पटेल, विघ्नेश कदम, राजेश महंत, सुरेंद्र हरमळकर आणि सुरेंद्र शेवाळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (MCA Elections 2022)

11 वर्षानंतर पुन्हा राजकीय नेता विरुद्ध माजी क्रिकेटर रंगणार लढत
विशेष म्हणजे तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये एमसीए अध्यपदासाठी लढत रंगणार आहे.
याअगोदर 2011 मध्ये माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar)
आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्यात एमसीएच्या अध्यपदासाठी निवडणूक झाली होती.
त्यावेळी विलासरावांनी वेंगसरकरांना मात दिली होती. त्यामुळे आताची निवडणूक कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- MCA Elections 2022 | mumbai cricket association president election on october 20 sharad pawar will vote from ashish shelars club

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Registration and Stamp Duty Dept | तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीबाबतचा अहवाल महसूल सचिवांकडे सादर

Nana Patole | ज्यांना स्वतःचा पक्ष नाही त्यांनी काँग्रेसवर बोलणे हास्यास्पद, नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Kolhapur ACB Trap | 3 हजारांची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News