NCB Raid | नांदेडमध्ये एनसीबीची ‘अफू’च्याअड्यावर धाड, 25 लाखांची 1 क्विंटल अफू जप्त

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – एनसीबीच्या मुंबई (Mumbai NCB) येथील पथकाने सोमवारी (दि.22) नांदेड शहरात (Nanded City) मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने शहरातील एका व्यापारी संकुलात छापा (NCB Raid) टाकून जवळपास 1 क्विंटल अफू (opium) जप्त  केली आहे. रात्री उशिरापर्यंत एनसीबीची कारवाई सुरु होती. एनसीबीने टाकलेल्या धाडीमध्ये (NCB Raid) 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच एनसीबीच्या पथकाने मांजरम येथे जवळपास 8 कोटी रुपायांचा गांजा पकडला होता. एनसीबीने एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी देखील मारल्या होत्या. विशाखापट्टणम् येथून आलेला हा गांजा (Marijuana) जळगावकडे नेण्यात येत असल्याची माहिती पथकाला  मिळाली होती. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यातच आज माळटेकडी परिसरात शंकरराव चव्हाण चौकात (Shankarrao Chavan Chowk) असलेल्या एका व्यापारी संकुलावर एनसीबीने धाड (NCB Raid) मारली.

यावेळी जवळपास एक क्विंटल अफू जप्त करण्यात आली. अफूची बाजारात 7 ते 12 हजार रुपये किलोने विक्री होते.
अफू विक्रीवर प्रतिबंध असून नांदेडमध्ये काही जण बनावट आणि जुन्या परवान्याच्या
आधारावर अफू विक्रीचा (NCB Raid) व्यवसाय करीत असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती.
या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

Web Title :- MCB Raid | ncb raids opium adda in nanded property worth rs 25-lakh confiscated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 768 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | ATM System मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची ED कडे तक्रार करण्याची गर्जना करणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रस्ताव मंजुरीच्यावेळी सभागृहातून ‘गायब’ ! राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘युटर्न’ घेत दिली भाजपला साथ

Multibagger Stocks | स्वस्तात मिळत आहेत Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलियोचे शेयर, चांगल्या रिटर्नची शक्यता