पुणे : चॉकलेट सुन्या टोळीवर मोक्काची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टोळीच्या वर्चस्ववादातून जनता वसाहतीत निल्या वाडकर याचा खून करणाऱ्या चॉकलेट सुन्या उर्फ चॉकलेट किशोर डोकेफोडे याच्या टोळीतील १९ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सुनील उर्फ चॉकलेट किशोर डोईफोडे, नवनाथ बाळासाहेब वाल्हेकर, योगेश राजेंद्र जांभळे, अभिजीत गणेश कडू, नितीन उर्फ मेट्या अंकुश मेटकरी, अतिष सतिश माळी, प्रकाश उर्फ पप्पू अरुण गायकवाड, सौरव रावसाहेब आढाव, राजेश रावसाहेब आढाव, अक्षय हरिभाऊ आंबवले, सुरज उर्फ सुरज्या बबन कोळगे, अभिजीता कदम, भीमराज राजू कांबळे, समीर राऊत नाटेकर, अविनाश उर्फ गौरव सुनील देवकुळे, शुभम एकनाथ खाडे, सतिश शाम माळी, यौगेश उर्फ नुन्या शशिकांत पवार, दिपक शेंडी उर्फ दिपक दत्तात्रय खिरीड अशी टोळी सदस्यांची नावे आहेत.

चॉकलेट सुन्या उर्फ सुनील उर्फ चॉकलेट किशोर डोकेफोडे याच्या टोळीच्या सदस्यांनी टोळीच्या वर्चस्ववादातून निल्या उर्फ निलेश वाडकर याचा खून केला होता. त्यावेळी अमोल कदम, गणेश जाधव, सुजित बंडबे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डोकेफोडे हा या टोळीचा प्रमुख असून त्याच्या साथीदारांनी सातत्याने परिसरात दहशतीचा अवलंब करत आपल्या टोळीच्या वर्चस्वासाठी खुन, खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी गंभीर दुखापत करणे, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे करत आहेत. त्यामुळे त्यांच्या बेकायदेशीर कृत्ये आणि संघटित गुन्हेगारी कृत्यांमुळे निर्माण झालेल्या दहशतीला आळा घालण्यासाठी मोक्कांतर्गत कारवाई करण्यास अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी मंजूरी दिली आहे.