MDH चे मालक मसाला किंग महाशय धर्मपाल गुलाटी यांचे 98 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन

नवी दिल्ली : महाशय दी हट्टी (एमडीएच) चे मालक आणि मसाला किंग नावाने प्रसिद्ध महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले. त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता, ज्यामधून बरे झाल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला.

धर्मपाल गुलाटी यांचा जन्म फाळणीपूर्वी 1923 मध्ये पाकिस्तान मध्ये झाला होता. एमडीएचला या टप्प्यावर आणण्यात धर्मपाल गुलाटी यांनी खुप मेहनत केली होती. केवळ पाचवी इयत्तेपर्यंत शिकलेले धर्मपाल गुलाटी यांनी जीवनातील सर्वोच्च स्तराला स्पर्श केला होता.

You might also like