MDH Owner Death : धर्मपाल गुलाटी एकेकाळी टांगा चालवून करत होते कमाई, जाणून घ्या कसा उभा केला कोटींचा व्यवसाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   असली मसाले सच-सच, MDH, MDH… ही जाहिरात आपण सगळ्यांनीच पाहिली आहे…. मसाला किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध एमडीएच मसाल्यांचे मास्टर महाशम धर्मपाल गुलाटी यांचे आज पहाटे 5.38 वाजता निधन झाले. कोरोनामधून बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 98 व्या वर्षी धर्मपाल यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव रात्री 9 वाजता जनकपुरीहून वसंत विहार घरी घेऊन जाईल.

आपण आज त्याच्या यशस्वी कथेविषयी जाणून घेऊया की, त्यांनी पाकिस्तान ते भारतापर्यंत कोट्यवधींचे व्यवसाय साम्राज्य कसे निर्माण केले –

महाशय धर्मपाल गुलाटी यांची कंपनी महाशियान द हट्टी (एमडीएच) ग्रुपचे मूल्यांकन सध्या 2000 कोटींपेक्षा जास्त आहे, परंतु त्यांच्या यशस्वी कथेविषयी फारसे लोकांना माहिती नाही. रोजगाराच्या शोधात दिल्लीत येऊन त्यांनी टांगा चालवायला सुरुवात केली; पण नियती काही वेगळी होती. म्हणूनच त्यांनी तो टांगा आपल्या भावाला देऊन मसाले विकण्यास सुरुवात केली.

दिल्लीला येऊन टांगा चालवण्यास सुरुवात केली : धर्मपाल गुलाटी यांच्यासमोर दिल्लीला येणे सर्वांत मोठे आव्हान होते. त्या दिवसांत धर्मपाल यांच्या खिशात फक्त 1500 रुपये उरले होते. वडिलांकडून मिळालेल्या या 1500 रुपयांपैकी 650 रुपयांत धर्मपाल यांनी घोडा व एक टांगा विकत घेतला आणि रेल्वे स्टेशनवर टांगा चालवायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर त्यांनी टांगा भावाला दिला आणि करोलबागमधील अजमल खान रोडवर एक छोटी टपरी लावून मसाले विकण्यास सुरुवात केली.

मसाल्यांचा व्यवसाय चालू : मिरचीच्या मसाल्यांच्या साम्राज्याचा पाया धर्मपाल यांनी या छोट्याशा टपरीवर स्थापित केला. सियालकोटची देगी मिरची आता दिल्लीत असल्याची माहिती लोकांना समजताच त्यांचा व्यवसाय झपाट्याने पसरू लागला. 60 च्या दशकाच्या उत्तरार्धात, महाशियान दि हट्टी हे करोल बागमधील मसाल्यांचे एक प्रसिद्ध दुकान बनले होते.

असे बनले एमडीएच : महाशय धर्मपाल यांच्या कुटुंबीयांनी छोट्या व्यवसायापासून आपल्या कामाची सुरुवात केली, परंतु व्यवसायात यश मिळाल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात दुकानावर दुकाने खरेदी केली.

त्या दिवसात बँकेकडून कर्ज घेण्याची प्रथा नव्हती, परंतु धर्मपाल यांनी ही जोखीम उचलली. 1959 मध्ये गुलाटी कुटुंबाने दिल्लीतील कीर्तीनगरात मसाले तयार करण्यासाठी प्रथम कारखाना सुरू केला. 93 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर सियालकोटची महाशियान दि हट्टी आता एमडीएच म्हणून जगात मसाल्यांचा ब्रँड बनली आहे.

2000 कोटी रुपयांचे व्यवसाय साम्राज्य : धर्मपाल गुलाटी यांचे व्यवसाय साम्राज्य आता 2000 कोटी रुपये आहे. त्यांची कंपनी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करते. परंतु एका टांगावाल्यामधून अरबपती होण्याचे त्यांचे अद्भुत यश 60 वर्षांच्या परिश्रम आणि समर्पणाचा परिणाम आहे. संपत्तीच्या ढिगावर बसून आजही प्रामाणिकपणा, परिश्रम आणि शिस्तीचा जुना धडा ते विसरले नाही. हेच कारण आहे की, आज त्यांचे मसाले जगातील शंभराहून अधिक देशांमध्ये वापरले जातात आणि यासाठी त्यांनी देश-विदेशात मसाल्यांच्या कारखान्यांचे मोठे साम्राज्य स्थापित केले आहे.

You might also like