‘MDH’ सांभर मसाल्यासंबंधित मोठा ‘खुलासा’ ! एका रिपोर्टनुसार मसाल्यात आढळला घातक ‘बॅक्टेरिया’

नवी दिल्ली  वृत्तसंस्था – भारतातील सर्वात प्रसिद्ध कंपनी असलेल्या MDH मसाल्यामध्ये आरोग्याला घातक बॅक्टेरिया असल्याचा दावा एका अमेरिकन कंपनीने केला आहे. अमेरिकन फूड रेग्यूलेटरने MDH कंपनीच्या सांभर मसाल्यामध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अमेरिकन रिटेल मार्केटमधील एका डिस्ट्रीब्युटरला आपल्या दुकानातील MDH मसाल्याचा लॉट काढून टाकावा लागला आहे.

यूएस फूड  अ‍ॅण्ड ड्रग ऑथेरिटी (USFDA) ने आपल्या अधिकृत प्रतिक्रियेत सांगितले की, MDH च्या या उत्पादनांना सर्टिफाइड लॅबमध्ये चेक करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की एफडीए ने यासंबंधित जेव्हा तपास केला तेव्हा समोर आले की, बाजारात MDH चे असे अनेक उत्पादनं विकली जात आहेत. या रिपोर्टनुसार यातून पसरणाऱ्या आजाराचे लक्षण असे आहे की याने डायरिया, पोटाच्या त्रास सह 12 ते 72 तासात जास्त ताप येतो. भारतात त्यांची पृष्ठी अजून झालेली नाही.

आता MDH मसाल्याचे काय होणार –
अमेरिकन फूड नियामकांनी अजून याची माहिती दिली नाही की कंपनीने याची जबाबदारी घेतली आहे की नाही, किंवा उत्पादन परत मागवले आहे की नाही. परंतू इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार कॅलिफोर्नियामध्ये हे मसाले विकले जात आहेत.

साल्मोनेलामधून घातक आजार –
या उत्पादनाबद्दल एफडीएने आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले आहे की, साल्मोनेला संकरित खाद्या खाल्याने माणसाला साल्मोनेलोसिस हा आजार होतो.एफडीएने सांगितले की अनेक प्रकरणात साल्मोनेलॉसिसचा उपचार होतो, परंतू काही प्रकरणात डायरियामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागते.
यामुळे रुग्णाला ताप, सर्दी, थकवा, किंवा लघवीतून रक्त येणे अशा समस्या उद्भवतात. हा आजार लहान मुलांना तसेच वयस्कर लोकांना लगेच होतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अमेरिकन रिटेलने सर्वात जास्त उत्पादनं परत मागवले त्यात आर – प्योर अग्रो स्पेशलिटीजचे आहेत. कॅनिफोर्नियात रिटेल स्टोअर्समध्ये या उत्पादनांना अमेरिकन सप्लायर हाऊस ऑफ स्पाइसेजला डिस्ट्रीब्यूट करतो.

     आरोग्यविषयक वृत्त