‘मला कोणीही हात लावू शकत नाही, मीच परम शिवा’, व्हायरल व्हिडिओमध्ये सांगतोय ‘फरार’ नित्यानंद (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश सोडून पळणाऱ्या बाबा नित्यानंद यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार पद्धतीने व्हायरल होत आहे. यामध्ये नित्यानंद म्हणतो, मला कोणीही पकडू शकत नाही, मीच परम शिव आहे. तसेच तो म्हणतो सर्व दुनिया माझ्या विरोधात परंतु तुम्ही येथे उपस्थित राहून माझ्याप्रती इमानदारी दाखवली आहे. आता मला कोणीही पकडू शकत नाही, मीच परम शिव आहे.

नित्यानंद यांनी सांगितले की, कोणतेच न्यायालय मला सत्य सांगून दोषी ठरवू शकत नाही. मीच परम शिव आहे. सरकारने सध्या नित्यानंद यांचा पासपोर्ट रद्द केलेला आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले की, एक वेब साईट बनवल्याने राष्ट्राची निर्मिती होत नाही. सध्या नित्यानंद यांनी दक्षिण अमेरिकेत एक द्वीप खरेदी करून देश उभारण्याची घोषणा केली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

https://twitter.com/YippeekiYay_DH/status/1197818470349463552

या देशाचे नाव कैलासा ठेवण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, वेबसाईट सुरु करणे म्हणजे राष्ट्र बनवणे असे नाही. त्यांनी सांगितले की विदेशातील सर्व मिशनरींना नित्यानंद यांच्या बाबत सतर्कता देण्यात आलेली आहे.

नित्यानंद यांना दुष्कर्म केल्याप्रकरणी देश सोडावा लागला होता. त्यानंतर इक्वाडोरच्या सरकारने नित्यानंद यांना आश्रय दिल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

Visit : Policenama.com