आलोकनाथ यांची अटकपूर्व जामीन साठी न्यायालयात धाव

मुंबई : वृत्तसंस्था : #MeTo मोहिमेअंतर्गत बलात्काराचा आरोप असलेले अभिनेते आलोकनाथ यांच्याविरोधात अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपाखाली एफआयआर दाखल झाल्याने अटक होण्यापासून बचाव करण्यासाठी बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर २० डिसेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
१९ वर्षांपूर्वी अनेकदा आलोकनाथ यांनी माझा लैंगिक छळ केला आहे. असा गंभीर आरोप लेखिका विनिता नंदा #MeTo मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर केला.यानंतर आलोकनाथ यांनी हे  सगळे आरोप फेटाळून लावले. आणि विनता नंदा यांच्याविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला. परंतु, याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती १७ ऑक्टोबरला त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा नोंदवल्याने ते अडचणीत आले आहेत. विनता नंदा यांच्याशिवाय अभिनेत्री संध्या मृदृल हिनेही आलोक नाथवर गैरवर्तनाचा आरोप केला होता.
काही दिवसापूर्वी या तक्रारीनंतर अलोकनाथ ‘बेपत्ता ‘ असल्याची माहिती  समोर आली होती .समन्स बजावण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते  पण तेथे कोणी नव्हते. आलोक नाथ यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, ते एका महत्त्वाच्या कामासाठी मुंबईबाहेर गेले आहेत. ते आपल्या सतत संपर्कात असल्याचा दावाही वकिलांनी केला होता .
‘सिन्टा’कडून अभिनेते आलोकनाथ यांचं सदस्यत्व रद्द –
या तक्रारी नंतर सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टानं अभिनेते अलोकनाथ यांचं सदस्यत्व रद्द केलं होत . याबाबतचं परिपत्रक काल सिन्टा या संघटनेनं काढल होत . दिग्दर्शक आणि निर्मात्या विनता नंदा यांनी अलोकनाथ यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळवणुकीचे आरोप केले होते.या प्रकाराची सिन्टानं गंभीर दखल घेतली आहे. सिन्टानं अलोकनाथ यांना बाजू मांडण्यासाठी वेळ दिला होता. मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नव्हता .