#MeToo : ‘रेप’ आणि ‘ओरल सेक्स’साठी भाग पाडायचा ‘हा’ प्रसिद्ध प्रोड्युसर, कोर्टानं ठरवलं ‘दोषी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध हॉलिवूड प्रोड्युसर हार्वी वीन्स्टीनवर अनेक हॉलिवूड अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. सोमवारी एका कोर्टानं हार्वीला या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. हार्वीला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. मीटू अभियानाअंतर्गत त्याच्याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले होते. एंजेलिना जोली आणि ग्वेनेथ पेलट्रो यांसारख्या बड्या अभिनेत्रींनी हार्वीविरोधात वक्तव्य केलं होतं.

हे सगळं प्रकरण तेव्हा समोर आलं होतं जेव्हा हॉलिवूड स्टार रोज मॅकगोवन हिनं ट्विट करत हार्वी विन्स्टीनवर आरोप केला होता की, 1997 मध्ये हार्वीनं जबरदस्तीनं ओरल सेक्स करण्यासाठी भाग पाडलं होतं. इतकेच नाही तर तिच्यावर रेपही करण्यात आला होता.

मीटू अभियानाअंतर्गत अनेक दिग्गजांचा खरा चेहरा समोर आला होता. या अभियानाअंतर्गत अनेक महिला पुढे आल्या आणि त्यांनी त्यांना आलेले अत्यचाराचे अनुभव सोशलवर सांगितले. हे अभियान नंतर बॉलिवूडमध्येही आलं होतं. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली होती. बॉलिवूड स्टार तनुश्री दत्तानं मीटू चळवळी अंतर्गत आवाज उठवला होता. यानंतर अनेक महिला पुढे येताना दिसल्या होत्या. तनुश्रीनंच भारतात या मोहिमेला सुरुवात केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.