भारताची तुर्कीला ‘समज’, म्हणाले – आमच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करू नका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० बाबत मागील काही दिवसात तुर्कीच्या वतीने दिलेले वक्तव्य वास्तविकपणे चुकीचे, पक्षपाती आणि अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, जेव्हा येथील सद्यस्थितीबद्दल माहित असेल, तेव्हाच तुर्कीने भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करावा. वास्तविक अलीकडे तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोआन यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली आणि कोरोना संकटादरम्यान भारताने काश्मीरवर अत्याचार केल्याचा आरोपही लावला होता. ईद-उल-अजहाच्या निमित्ताने एर्दोगान यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संवाद साधला होता आणि काश्मिर मुद्द्यात पाकिस्तानला पाठिंबा देण्यास बोलले होते.

तुर्कीचा दिलासा
त्याच बरोबर काही दिवसांपूर्वी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोआन यांनी पाकिस्तानी समकक्ष आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवर बोलताना आश्वासन दिले होते की, त्यांचा देश काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानच्या पाठीशी उभा आहे. तुर्कीने यापूर्वीही बर्‍याच वेळा पाकिस्तानला असे आश्वासन दिले आहे. पण पाकिस्तानला ठाऊक आहे की, संपूर्ण जग भारताच्या पाठीशी उभे आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी ईदनिमित्त राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवर बर्‍याच मुद्द्यांवर चर्चा केली.

तुर्की पाकिस्तान भाऊ-भाऊ
पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या वतीने ट्विट करण्यात आले होते की, ‘ईद-उल-अजहानिमित्त अध्यक्ष आरिफ अल्वी आणि राष्ट्रपती रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी फोनवर बोलताना एकमेकांना शुभेच्छा दिल्या. काश्मीर आणि कोविड-१९ सारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. पाकिस्तान यूएनजीएच्या आधी अध्यक्ष एर्दोगन यांच्या स्पष्ट विधानाचे कौतुक करतो.’ दुसर्‍या एका ट्वीटमध्ये अल्वी म्हणाले की, ‘तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी आश्वासन दिले आहे की त्यांचा देश काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा देईल, कारण भावासारख्या दोन्ही देशांचे लक्ष्य एक आहे.’ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाकडूनही या गोष्टी पुनःपुन्हा सांगण्यात आल्या आहेत.

कुलभूषण प्रकरणावर एमईए
कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, यासंदर्भात पाकिस्तानकडून अद्याप कोणताही संवाद प्राप्त झालेला नाही. मंत्रालयाने म्हटले की, पाकिस्तानने त्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय कौन्सिलर प्रवेश देण्याची आवश्यकता आहे. नुकतेच इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जाधव यांच्या वकिलाच्या नियुक्तीसंदर्भात केलेल्या याचिकेत सुनावणी दरम्यान भारतीय बाजूंना संधी देण्याचा निर्देश दिला होता. एमईएने म्हटले की, पाकिस्तानने मूलभूत समस्या सोडवण्याची गरज आहे. हे मुद्दे आंतरराष्ट्रीय न्यायालया (आयसीजे) च्या निर्णयाचा प्रभावी आढावा, पूर्ती आणि अंमलबजावणीशी संबंधित आहेत. ते म्हणाले की, हे मुद्दे आपल्याला संबंधित कागदपत्रे उपलब्ध करण्याशी आणि कुलभूषण जाधव यांच्यापर्यंत अप्रभावित, बिनशर्त कौन्सिलर प्रदान करण्यासंदर्भात आहेत.