22 वर्षीय कन्नड TV अभिनेत्री ‘मेबिना मायकल’चं अपघातात निधन !

पोलीसनामा ऑनलाइन –  पियाते हुदुगीर हल्ली लाईफ सीजन 4 (Pyate Hudgir Halli Life Season 4) हा रिअ‍ॅलिटी शो जिंकल्यानंतर चर्चेत आलेली कन्नड टीव्ही अभिनेत्री मेबिना मायकल (Mebiena Micheal) हिचं मंगळवारी (दि 26 मे 2020) सायंकाळी रोड अपघातात निधन झालं आहे. मेबिना 22 वर्षांची होती. समोर आलेल्या माहितीनुसार ती तिच्या होमटाऊनला जात होती.

मेबिनाचं असं अचानक निधन झाल्यानंतर पियाते हुदुगीर हल्ली लाईफ सीजन (Pyate Hudgir Halli Life Season) या रिअ‍ॅलिटी शोचे होस्ट अकुल बालाजी यांनी ट्विटरवरू शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

अकुल यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, “माझी आवडती स्पर्धक आणि पीएचएचएल 4 ची विजेता मेबिना हिचं निधन झाल्याचं ऐकल्यानंतर धक्का बसला. एवढी तरूण आणि कमी वयात मेबिनानं जगाचा निरोप घेतला आहे ही गोष्ट पचवता येत नाही. तिच्या कुटुंबियांना या दु:खाचा सामना करता यावा म्हणून प्रार्थना करतो.” रिअ‍ॅलिटी शोच्या फिनालेमधील त्यांचे काही फोटोही अकुलनं शेअर केले आहेत.

मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी मेबिनानं मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. तिच्या अचानक जाण्यानं कुटुंबीय आणि चाहते दु:खात आहेत.