प्रवीण तोगडियांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘मक्का मदीना देखील आमच्या पुर्वजांचं होतं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोंडा येथील हिंदू रक्षा निधी अर्पण कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की मक्का मदिना देखील आमच्या पूर्वजांचे होते. फक्त भारतच नाही तर अमेरिका, रशिया, जपान आणि मक्का मदिना हे देखील माझ्या बापाचे होते… एवढेच नाही तर त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की गोंडा, बहराइचमधील लोकांना जागे होणे आवश्यक आहे नाहीतर अरबस्तान होण्यास वेळ लागणार नाही.

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले की देशाचा कायदा नेहरू-लियाकत करार हा हिंदूंच्या संरक्षणासाठीचे अपयशाचे प्रमाणपत्र आहे. तोगडिया म्हणाले की, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी निर्णय घेण्यात आला होता की पाकिस्तानमधील हिंदूंवर जर अत्याचार झाला तर भारत आवाज उठवेल आणि भारतात मुस्लिमांवर अत्याचार झाला तर पाकिस्तान आवाज उठवेल. परंतु ७० वर्षांपासून यावर कोणीही आवाज उठविला नाही.

नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी आवाज उठवला का ? नाही, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांनी देखील आवाज उठवला नाही. देशात हा कायदा बनवावा लागला कारण भारत सरकारने पाकिस्तानच्या हिंदूंना संरक्षण दिले नाही म्हणून नेहरू लियाकत कराराच्या अंतर्गत हिंदूंचे संरक्षण करण्यात भारत सरकार अपयशी ठरले याचे प्रमाणपत्र म्हणजेच हा कायदा आहे.

फेसबुक पेज लाईक करा –