Corona Virus : ‘कोरोना’मुळं सौदी अरेबियानं मक्का-मदीना यात्रेवर आणली बंदी, निलंबीत केले प्रवाशांचे एन्ट्री व्हिसा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या मक्का – मदीना येथे जाण्यास सौदी अरेबियाने बंदी घातली आहे. वार्षिक हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत मध्य-पूर्व देशांमध्ये कोरोना संसर्गाची 220 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. मक्काव्यतिरिक्त अरबमधील मदीना येथे असलेल्या पैगंबर मोहम्मद यांच्या मशिदी यात्रेस जाण्यास मनाई केली आहे. तेलाने समृद्ध असलेल्या सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग किती गंभीर आहे, हे दिसून येते.

सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले कि, आम्ही सर्व देशांचे प्रवेश व्हिसा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने सांगितले की, “कोरोना व्हायरस थांबविण्यासाठी सौदी अरेबिया देखील जगाबरोबर आहे. आम्ही आमच्या देशातील नागरिकांना कोरोना विषाणूमुळे पीडित असलेल्या देशांमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आम्ही प्रार्थना करतो की, या विषाणूपासून संपूर्ण मानवतेचे रक्षण होवो.’

दरम्यान, मध्यपूर्वेतील देशांमध्ये इराणला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इराणचे उप आरोग्यमंत्री इराज हरिरकी हे देखील यामुळे प्रभावित झाले असून त्यांना उपचारासाठी बाजूला ठेवण्यात आले आहे. इराणमध्ये कोरोना संसर्गाची 139 प्रकरणे समोर आली असून त्यापैकी की 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बहरिनमध्ये 33 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे सौदी अरेबियामध्ये असलेल्या मक्का आणि मदीनामध्ये दर महिन्याला हजारो लोक उमरा करण्यासाठी येतात. दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांच्या संख्येत घट झाली असली तरी मध्य-पूर्व देशांमध्ये नवीन प्रकरणे सातत्याने नोंदविली जात आहेत.