कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीचे दुचाकी दुरुस्तीतून आत्मनिर्भतेकडे पाऊल

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन  –   प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने मुली काम करताना दिसतात. मग ते कोणतेही क्षेत्र असो, गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण केद्रांकडे तरुणांचा ओढा वाढलेला दिसत आहे़ तरुणींनीही औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेऊन स्वत:चे करिअर घडवणाऱ्या अनेक मुली आज समाजात आहेत. या क्षेत्रात आज वेगवेगळे कोर्स उपलब्ध आहेत. निव्वळ आवड आणि जिद्दीच्या जोरावर मेकॅनिकल आणि व्हेईकल दुरुस्ती करत कोल्हापुरच्या शिवानी भोपळेने आत्मनिर्भतेकडे एक पाऊल टाकले आहे.

शिवानी मुळची कोल्हापुरची रहिवासी. कोणतही टेक्निकल बॅग्रांउड नसताना केवळ आवड आणि वेगळ काहीतरी करण्याच्या कुणकुण तिली इथंवर घेऊन आली. १० वी नंतर तिने कोल्हापुरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला आणि तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली. ३० मुलांमध्ये कोर्ससाठी प्रवेश घेणारी ती एकमेव मुलगी असल्याचे ती सांगते. सहा महिन्यानंतर तिने प्रशिक्षणार्थी म्हणून एक ठिकाणी काम करायला सुरुवात केली. ऑइल बदली, फिल्टर काढणे, काबोर्रेट चेक करणे, जनरल चेकअप, इंडिकेटर चेकअप, स्पीड मीटर, चेन टाइट करणे अशी सर्व कामात आज ती तरबेज झाली आहे. प्रॅक्टीस म्हणूम रुजु झालेली शिवानी दीड वर्ष झालं तिथेच सुनील दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे. यामध्ये इंजिन जोडणे हे आव्हानाच काम असतं पण मी अजुन ते शिकत आहे असे शिवानीने सांगितले.

अनेकांनी हे क्षेत्र मुलींच आहे का? तु कशी काय हे काम करु शकते ? याबद्दल बरचं काही मला सांगितलं. मात्र, घरच्यांच्या पाठिंब्यामुळे आज आवडत्या क्षेत्रात आनंदाने काम करत असल्याचे तिनं सांगितले. या क्षेत्राकडे मुलींचा कल वाढयला हवा. आज मार्केटमध्येही जॉबची शाश्वती नाही. अशावेळी वेगळं काम, वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी थोड आगळ वेगळ करणे ही काळाची गरज बनली आहे. या क्षेत्राकडे फक्त मुलांचे क्षेत्र आहे आणि आम्ही मुली हे कसं करु असा न्युनगंड न ठेवता एक आव्हान म्हणून पाहिले पाहिजे़ मला अजुन खुप काही शिकायचे बाकी आहे. येत्या काही दिवसांत ते सगळं शिकायचं आहे. भविष्यात याच क्षेत्रात नविन काहीतरी शिकून आत्मनिर्भर होणार असल्याचे शिवानी भोपळे हिने शेवटी सांगितले.