Mechanical Sweeping On Pune Main Road | शहरातील तीन झोनमधील प्रमुख रस्त्यांवरील ‘मॅकेनिकल स्विपिंग’ ठप्प

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mechanical Sweeping On Pune Main Road | मॅकेनिकल स्विपिंगचे कंत्राट घेतलेल्या कंपनीकडील गाड्या बँकेने जप्त केल्याने शहरातील तीन झोनमधील रस्त्यांच्या स्वच्छतेचे काम ठप्प झाले आहे. यामुळे या झोनमधील रस्ते आणि उड्डाणपुलांवरही कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष असे की या रस्त्यांच्या कडेला माती आणि वाळू साठल्याने त्यावरून दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मागील काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची सफाई यांत्रिक पद्धतीने करण्यात येते. रात्रीच्यावेळी या वाहनांच्या मार्फत सफाई होत असते. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचले आहेत. तसेच वाळू आणि माती देखिल पसरली आहे. विशेषत: सातारा रस्ता, सोलापूर रस्ता आणि या मार्गावरील उड्डाणपुलांवर मोठ्याप्रमाणावर कचरा दिसून येत आहे. वाळू आणि कचर्‍यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

यासंदर्भात घनकचरा विभागाचे (Solid Waste Management PMC) उपायुक्त संदीप कदम (Sandeep Kadam PMC)
यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले शहरातील रस्त्यांची दोन ठेकेदारांच्या मार्फत मॅकेनिकल स्विपिंग केले जाते.
यापैकी एका ठेकेदाराकडे दोन झोनचे तर दुसर्‍याकडे तीन झोनमधील रस्ते सफाईचे काम आहे.
एका ठेकेदार कंपनीकडील स्विपिंगची वाहने बँकेने ओढून नेल्याने काही आठवड्यांपासून तीन झोनमधील रस्त्यांच्या सफाईचेे काम थांबले आहे.
हे रस्ते आणि या रस्त्यांवरील उड्डाणपुलांची स्वच्छता करण्याचे आदेश संबधित क्षेत्रिय कार्यालयांना सांगितले आहे. लवकरच क्षेत्रिय कार्यालयांमार्फत स्वच्छता करण्यात येईल. तसेच लोकसभा आचारसंहिता संपताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेष – डॉ. अमोल कोल्हे

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Baramati Pune Crime | पुणे : वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू