Medha Patkar-Bill Gates | ‘कोरोना वुहानच्या ज्या लॅबमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स’ – मेधा पाटकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Medha Patkar – Bill Gates | कोरोनामुळे संपुर्ण जगाला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. अद्यापही कोरोनाच्या एक – एक लाटा येत आहेत त्याचे परिणाम सहन करावे लागत आहेत. कोरोना (Corona) चीनने पसरवला असं अनेकदा बोललं जातं. मात्र अशातच ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्यावर गंभीर आणि धक्कादायक आरोप केला आहे.

 

चीनमधील (China) ज्या वुहान शहराच्या ज्या लॅबमधून कोरोना निघाला त्या लॅबचे मालक बिलगेट्स असल्याचं मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे. बिल गेट्सच्या फाऊंडेशनने संपुर्ण जगातील शेती स्वत: ला घेण्याचा डाव रचला आहे. बिलगेट्स स्वत: 2 लाख 40 हजार एकरचा मालक असल्याचंही मेधा पाटकर यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री तोमर (Narendra Singh Tomar) यांच्यावरही निशाणा साधला.

 

तोमर यांनी बिल गेट्सना भारतात (India) येण्याचे निमंत्रण दिले आहे.
तोमर यांनी याबाबतची दखल घेतली नाही म्हणनू 1 हजार शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असल्याचंही मेधा पाटकर म्हणाल्या.
आता दोन ते तीन दिवसांमागे बिल गेट्स यांनी नव्या महामारीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, आणखी एक महामारी (Epidemic) लवकरच येणार आहे मात्र कोरोनापेक्षा ही पुढील महामारी वेगळी असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर आता मेधा पाटकर यांनी केलेल्या आरोपामुळे याबाबत अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

 

Web Title :- Medha Patkar-Bill Gates | medha patkar alligation on bill gates bill gates owner of the wuhan laboratory where corona birth serious allegations of medha patkar in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा