माध्यमांनी यापुढे ‘दलित’ शब्द वापरू नये – न्यायालय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

यापुढे कुठल्याही माध्यमांना दलित शब्द वापरता येणार नाही. नागपूर खंडपीठाने प्रसार माध्यमांसाठी आज (बुधवार) हा नवा आदेश जारी केला आहे. यामुळे आता दलित शब्दाऐवजी अनुसूचित जाती असा उल्लेख करायला लागणार आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच राज्य सरकारच्या रेकॉर्डवरून पुढील चार आठवड्यांत दलित शब्द काढून त्या ऐवजी अनुसूचित जाती असा उल्लेख करण्यात येणार आहे. याबरोबरच अन्य सर्व प्रसार माध्यमांना देखील न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. यापूर्वीही न्यायालयाने काही शब्द कामकाजातून वगळण्याचे आदेश दिलेले आहेत. भोपाळ (मध्यप्रदेश) उच्च न्यायालयाने नुकतेच केंद्र आणि राज्य सरकारने अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती यांच्यासाठी कार्यालयीन कामकाजात दलित शब्द वापरू नये असे सांगितले होते.