वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ‘त्या’ पिंपरी-चिंचवड मधील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे / पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती वादातुन वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विवाहीतेने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्‍कादायक घटना पिंपरी-चिंचवड परिसरात शुक्रवारी घडली होती. पत्नीने स्वतः पेटवुन घेतल्यानंतर डॉक्टर पतीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत विवाहीता 95 टक्के तर डॉक्टर पती 20 टक्के भाजले आहेत.

या महिलेला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा आज मृत्यू झाला.
डॉ. चेतन चौधरी आणि योगिता यांच्यात नेहमीच वाद होत होते. याच वादातून योगिताने शुक्रवारी रात्री पेटवून घेतले. या घटनेत योगिता ९५ टक्के भाजली होती. तर तिला वाचवण्यासाठी गेलेले पती डॉ. चेतन हे २० टक्के भाजल्याने दोघांना पुण्यातील खासगी रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज योगिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नेमके काय घडले

डॉ. योगिता चौधरी असे मृत्यू झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. तर पती चेतन चौधरी हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नऊ वर्षापुर्वी योगिता आणि चेतन यांचे लग्‍न झाले. त्यांना एक सात वर्षाचं मुल देखील आहे. वेळोवेळी योगिता आणि चेतन यांच्यामध्ये वाद होत होते. ते दोघे आणि सासू-सासरे एकाच घरात राहतात. एकाच घरात राहून देखील ते वेगवेगळा स्वयंपाक करत असत.

उतार वयात काम होत नसल्याने योगिता यांच्या सासूने काम करण्यास एक बाईला ठेवली होती. शुक्रवारी योगिता यांना स्वयंपाक करण्याचा कंटाळाला आल्याने सासुकडे काम करण्यास येणार्‍या बाईला त्यांनी चपात्या करायला सांगितले. मात्र, तिने त्यास नकार दिला. सासुनेच तिला नकार देण्यास सांगितले असावे असा समज योगित यांना झाला. त्यानंतर योगिता यांनी सासू-सासर्‍यांना मारहाण केली. यापुर्वीच डोळयांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे सासर्‍यांना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. दरम्यान, चेतन यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात योगिताविरूध्द तक्रार दिली. झालेला प्रकार सामंस्याने मिटविण्यात आल्यानंतर चेतन घरी गेले आणि पुन्हा त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले.

योगिता यांनी मुंग्या मारण्याचे औषध पाण्यात टाकून प्राशन केले खरे मात्र नंतर मळमळ होण्यास सुरवात झाल्यानंतर पतीला घरी बोलावुन घेतले. चेतन यांनी योगितास मारहाण केली. त्यानंतर झालेल्या झटापटीमध्ये चेतनने दोघांच्या अंगावर रॉकेल टाकुन घेतले. त्यामध्येच योगित यांनी स्वतः पेटवुन घेतले. त्यांना वाचविण्यासाठी चेतन यांनी धाव घेतली. मात्र, तो पर्यंत योगिता आगीच्या लपेटयात आल्या होत्या. यामध्ये योगिता 95 टक्के तर डॉ. चेतन हे 20 टक्के भाजले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत असताना योगिताचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

डिस्चार्ज मिळाल्यनंतर अटक करणार

पती चेदन चौधरी, सूसू रजनी चौधरी आणि सासरे गोविंद चौधरी यांची प्रकृती बिघडल्याने ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाईल असे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like