मेडिकल बोर्डचा निर्णय ! BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना पुन्हा अँजियोप्लास्टीतून जावे लागणार

कोलकाता : वृत्तसंस्था – टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची पुढील काही दिवसांत किंवा आठवड्यांत पुन्हा अँजियोप्लास्टी करावी लागणार आहे. वुडलँड्स हॉस्पीटलने सोमवारी सौरवच्या आरोग्याबाबत ही माहिती दिली. सौरव गांगुलीला शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर येथे दाखल करण्यात आले होते आणि त्याच दिवशी त्याची अँजियोप्लास्टी सुद्धा झाली होती. त्याच्या हृदयाच्या तीन धमण्यांमध्ये अडथळा दिसून आला होता, जो हटवण्यासाठी एक स्टेंट लावण्यात आले होते.

वुडलँड्स हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली बसु यांनी सांगितले की, सौरव गांगुलीची दुसर्‍यांदा अँजियोप्लास्टी आवश्यक आहे, परंतु त्याची स्थिर प्रकृती पाहता उपचारासाठी गठित नऊ सदस्यीय मेडिकल बोर्डने सर्व संमतीने पुढील काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये अँजियोप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सौरवच्या आरोग्याबाबत सोमवारी झालेल्या मेडिकल बोर्डाच्या बैठकीत प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. आरके पांडा सुद्धा व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर अमेरिकेतून आणखी एक तज्ज्ञ सुद्धा फोनद्वारे संपर्कात होते. डॉ. बसु, जे स्वता सुद्धा मेडिकल बोर्डात सहभागी आहेत, त्यांनी म्हटले की, सौरवला मंगळवार नंतर शक्यता आहे की डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. डॉक्टर घरीसुद्धा सातत्याने सौरवच्या आरोग्यावर लक्ष ठेवतील.

डॉ. देवी शेट्टी मंगळवारी सौरवला पाहण्यासाठी हॉस्पीटमध्ये येतील. मेडिकल बोर्डची बैठक सोमवारी सकाळी 11:30 वाजता झाली, ज्यामध्ये सौरवच्या कुटुंबाचे सदस्य सुद्धा उपस्थित होते. बोर्डाच्या सदस्यांनी सौरवचा मेडिकल रेकॉर्ड आणि त्याची सध्याची स्थिती याचे अवलोकन केले. सौरवच्या हृदयात दोन अन्य कोरोनरी ब्लॉकेज म्हणजे एलएडी आणि ओएम 2 ला अँजियोप्लास्टीद्वारे क्लियर केले आहेत. बैठकीत कुटुंबाच्या सदस्यांना पुढील उपचाराच्या योजनांची माहिती सांगण्यात आली. सौरवने रविवारी रात्री 10 वाजता भोजन केले होते. त्याच्या रात्रीच्या जेवणात डाळ, भाजी, भात आणि दही होते.

सोमवार सकाळी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर ग्रेग चॅपल यांनी सौरवशी फोनवरून संपर्क साधून विचारपूस केली. तर बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन सौरवची भेट घेतली.