वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थींनीची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर येथील राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या  एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. ही तरुणी परिचारिका कोर्सच्या दुसऱ्या  वर्षात शिकत होती. ही विद्यार्थीनी बाहेरगावची राहणार आहे.

शुक्रवारी सकाळी महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या खिडकीतून काही मुलींनी पाहिले असताना या तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती त्यांनी तातडीने वसतीगृहाच्या रेक्टर यांना सांगितली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आहे.

पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांनी या तरुणीचा मृतदेह खाली उतरवून उत्तरतपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे. या तरुणींच्या  आत्महत्येमागील नेमके कारण काय?. याचा तपास पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/