सहमती असतानाही डॉक्टरांना रुग्णाशी शरीरसंबंध ठेवण्यास बंदी : MCI चा नवीन नियम

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता कोणत्याही हॉस्पिटलमधील डॉक्टरला रुग्णाची सहमती असली तरी देखील रुग्णाशी शारीरिक संबंध ठेवता येणार नाही. इतकेच नाही, तर शारीरिक संबंधासाठी रुग्णाने पहिले पाऊल उचलले असले तरी देखील डॉक्टरला असे करता येणार नाही. असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

देशभरातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये काम करणारे डॉक्टर सहमतीनेही रुग्णाशी शारीरिक संबंध ठेवू शकणार नाहीत. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टाने लैंगिक दुर्व्यवहारांबाबत एमसीआयचे निर्देश काय आहेत अशी विचारणा केली होती. त्यानंतर एमसीआयने नवी मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेतील एका भारतीय वंशाच्या डॉक्टरच्या संबंधात आपले मत देण्याबाबत हायकोर्टाने एमसीआयकडे विचारणा केली होती. ते डॉक्टर एमसीआयशी संबंधीत होते. या प्रकरणानंतर हायकोर्टाने एमसीआयला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले असे समितीच्या सदस्याने सांगितले.

अशा प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे ही काही नवी गोष्ट नाही असे मेडिकल कॉलेजांमध्ये शिकवणाऱ्या अनेक प्राध्यापकांचे म्हणणे आहे. ही तत्त्वे म्हणजे आमच्या आचारसंहितेचाच एक भाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही चुकीच्या लोकांमुळे संपूर्ण व्यावसायावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते आणि अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, असे मत काही डॉक्टरांनी व्यक्त केले.

Loading...
You might also like