वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने त्या तरुणीचा मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – किनवट तालुक्यात शासकीय वैद्यकीय व्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना तालुक्यातील दहेली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहावयास मिळाली दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने पालाईगुडा येथील १८ वर्षीय तरुणीचा उपचारा आभावी तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या बाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे तर प्रकरणी नाते वाचकांच्या तक्रारी नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सिंदखेड पोलीस ठाण्यात मध्ये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की संपूर्ण किनवट तालुक्याची आरोग्य व्यवस्थाच रूग्नशैय्येवर आहे. याबाबत अनेक तक्रारी असुनही याची दखल घेण्यात येत नसल्याने तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयसह सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बनल्या बनल्या आहे म्हणावे तर सर्वच ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत परंतु कर्तव्यावर हजर राहत नसल्याने ग्रामीण भागात आरोग्याची तीनतेरा वाजले आहे.

दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित विषेश बाब म्हणजे दहेलीतांडा गाव किनवट माहूर चे आमदार प्रदीप नाईक यांचे गाव आहे. आमदारांच्या गावातील आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा प्रश्न गंभीर म्हणावा लागेल. पालाईगुडा येथील कु. काजल नावाची १८ वर्षीय तरुणीला ८ नोव्हेंबर रोजी ताप आल्याने दहेली तांडाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी १२.१५वाजता आणण्यात आले परंतु तिच्यावर उपचार करण्याकरिता दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने नाईलाजास्तव तीला रुग्णवाहिकेमधुन किनवट उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. परंतु दुर्दैवाने किनवटला पोहोचण्याआधीच तरुणीचा उपचारा आभावी तडफडून करुन अंत झाला.

किनवट पोहचल्यावर सदर तरूणी मयत झाल्याचे सांगण्यात आल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली दहेली येथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित असले तर तरूणी चे प्राण वाचले असते. म्हणून तरुणीचा मृत्यूला दहेली तांडा येथील वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचे सांगत सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होउन कारवाई होईपर्यंत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे पवित्रा नातेवाईकांनी केला.

दरम्यान मयतचा भाऊ अविनाश विष्णु राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन सिंदखेड मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. जायभाये यांच्या विरुद्ध गु. र.न.१०६/२०१८ कलम ३०४( अ) भा द वी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेनंतर मृतदेह हलविण्यात आले. दरम्यान घटने बाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असून किनवट सारख्या अतिदुर्गम भागात वैद्यकीय यंत्रणेचा वाभाडे काढणारी आहे. तरुणीचा मृत्यूबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत असून. वरिष्ठांनी प्रकाराकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.