पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमास मराठा आरक्षण यंदा नाही : उच्च न्यायालय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पदव्युत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मराठा आरक्षण यंदा लागू नाही. तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला पुढच्या वर्षी मराठा आरक्षण लागू होणार आहे. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

वैद्यकिय पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेत १६ टक्के मराठा आरक्षण लागू केल्याविरोधात काही विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. आरक्षणाचा सर्वाधिक फटका खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यांच्यासाठी केवळ १८ टक्के जागा शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे १६ टक्के आरक्षणावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली.

वैद्यकिय पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पुर्वीपासून असलेली सामाजिक आरक्षणे आणि नव्याने आलेले मराठा आरक्षण त्याच आर्थिक दृष्ट्‍या मागास विद्यार्थ्यांचे आरक्षण यामुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला आहे. या याचिकेवर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी केली. न्यायालयाने वैद्यकिय पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.