Coronavirus : चीनमध्ये ‘कोरोना’मुळं वैद्यकीय क्षेत्रात मोठी ‘दहशत’, डॉक्टरांना नाही येत ‘झोप’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग या वेळी कोरोना विषाणूचा सामना करत असून याचा प्रादुर्भाव चीनच्या वुहान शहरातून झाला आणि त्यामुळे चीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. चीनमध्ये या विषाणूच्या रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर इतके भयभीत झाले आहेत की, त्यांची रात्रीची झोप गायब झाली आहे.
कोरोना व्हायरस तिथे डॉक्टरांना मानसिक रूपानेही आजारी करत आहे. एका संशोधनानुसार, यामुळे चीनच्या एक तृतीयांश डॉक्टरांना झोप न येण्याची समस्या उद्भवत आहे.
संशोधनानुसार, चीनमध्ये कोरोनावर उपचार करणाऱ्या एक तृतीयांश मेडिकल स्टाफला इंसोमनिया नावाचा आजार होऊ लागला आहे. या आजारामुळे लोकांना झोप न येण्याची समस्या उद्भवत आहे.
संशोधनात समोर आले की, जे डॉक्टर किंवा मेडिकल स्टाफ कोरोना संक्रमित रुग्णांच्या जास्त जवळ असतात त्यांना ही समस्या येत आहे. त्यांना भीती वाटत आहे कि त्यांनाही व्हायरसचे संक्रमण होऊ शकते.
चीनच्या साऊथर्न मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर बिन झान्ग यांनी संशोधन केले असून या संशोधनात १५६३ अशा लोकांना शामिल केले गेले आहे जे मेडिकलशी संबंधित आहेत. संशोधनाचे लेखक बिन झान्ग यांनी म्हटले की, हा आजार काही दिवसात जातो पण जर कोरोनाचा प्रभाव संपला नाही तर हा कायमस्वरूपी राहू शकतो.