पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना मिरज अधिष्ठतांकडून अपमानास्पद वागणूक

अंबेजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या अंबेजोगाईच्या एस आर टी आर जी एम कॉलेज अँड हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी आपल्या मॉर्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेमार्फत महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र लिहून कॅम्पबद्दल आलेल्या अतिशय वाईट अनुभवाबद्दल कळविले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाविद्यालयाचे ३० जणांचे वैद्यकीय पथक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० आॅगस्टला मिरज वैद्यकीय महाविद्यालयात पोहचले. तेथील अधिष्ठता डॉ. पल्लवी सापळे यांनी ‘आम्ही अंबेजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोकांना आमंत्रित केले नाही. तुम्हाला कोल्हापूरात जावे लागेल. परंतु, तेथे जाण्यचा मार्ग पुढील सात दिवसांकरिता बंद असून तुम्हाला कर्नाटक मार्गे जावे लागेल. व रस्त्यात जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी माझी राहणार नाही़. ’

तो मार्गही बंद असल्यामुळे  त्यांनी तेथेच मुक्काम करुन तेथेच वैद्यकीय सेवा देण्याचे ठरविले. पहिल्या दिवशी त्यांना जेवणही उपलब्ध झाले नाही. राहण्याची देखील गैरसोय झाली. इतकेच नसून त्याची टॉयलेट, बाथरुमची सुद्धा गैरसोय झाली. त्याविषयी विचारल्यावर आम्ही काय तुमच्यासाठी टॉयलेट बाथरुमची सोय करण्यासाठी आलो आहोत का.

तसेच तुमच्याकडे मुबलक औषधसाठा आहे. तुम्ही आणलेल्या तुमच्या वैद्यकीय महाविद्यालयामधून औषधांची आम्हाला काहीही गरज नाही. असे बोलून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याच्या भावनेने आलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता यांनी अपमानित करण्याचा हा प्रकार घडला आहे. त्यामुळे इथून पुढील कॅम्पकरिता आपल्या येथील निवासी डॉक्टरांना पाठविण्यात येऊ नये अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त