‘या’ विद्यार्थ्यांना ‘स्कर्ट-बरमुडा’ची बंदी, परिक्षेसाठी वेगळा ड्रेस कोड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

नाशिकच्या ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना चुकूनसुद्धा कॉलेज परिसरात शॉर्टस्, शॉर्ट पँट, स्कर्ट, बरमुडा, असे कपडे घालता येणार नाहीत. त्याचवेळी परीक्षा देताना आणखी वेग‍ळा ड्रेस कोड विद्यार्थ्यांना लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेगवेगळा ड्रेस कोड राहणार आहे.

विद्यापीठाच्या विद्या परिषद बैठकीत याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले आहे. यानुसार, विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा ड्रेस कोड लागू असणार आहे. महाविद्यालय, रुग्णालय व ग्रंथालय परिसरामध्ये वावरताना हा ड्रेस कोड विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना शर्ट व फुल पँट, अॅप्रन, शूज बंधनकारक केले आहेत. आखूड पँट किंवा बरमुडा घालता येणार नाही. तसेच विद्यार्थिनींना शर्ट-फुल पँट किंवा साडी किंवा सलवार-कमीज, अॅप्रन, शूज बंधनकारक आहेत. त्यांना कॉलेज, रुग्णालय व ग्रंथालय परिसरात बिनबाहिचे शर्ट, बरमुडा, शॉर्ट पँट किंवा स्कर्ट घालता येणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
[amazon_link asins=’B01HTUZF30′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a790e9c-9952-11e8-849a-25ea2e2bad90′]
त्याचप्रमाणे परीक्षा देताना विद्यार्थी-विद्यार्थिनींना अर्ध्या बाहिचे शर्ट किंवा टी-शर्ट किंवा फिक्या रंगाचा शर्ट व फुल पँट किंवा साडी-सलवार-कमीज बंधनकारक करण्यात आली आहे. नक्षीदार बटण, अंगठी-साखळी किंवा अॅप्रन-टोपी-गॉगल-पर्स-वॉलेटसह किंवा घड्याळ व कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह परीक्षा देता येणार नाही. परीक्षेवेळी पायात चप्पल असावी, शुज नव्हे, असेही परिपत्रकात नमूद आहे.