Coronavirus : सव्वा कोटी ‘मास्क’, दीड कोटीहून जास्त ‘पीपीई’ किट, ‘कोरोना’ विरूध्दच्या ‘दीर्घ’ लढाईसाठी मोठी तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारी विरूद्धची लढाई खूप काळ चालणार आहे आणि ती न थकता जिंकायची आहे, असे म्हटले आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी देशवासीयांच्या सतर्कतेबरोबरच सरकारची तयारीही अत्यंत महत्वाची आहे. लॉकडाऊनमध्ये जनतेकडून पाठिंबा दर्शवला जात आहे, ज्याचे पंतप्रधान मोदी उघडपणे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर शासकीय पातळीवरही मोठी तयारी केली जात आहे. कोरोनाला पराभूत करणारे सर्वात मोठे योद्धा आहेत डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी. त्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट म्हणजे पीपीई आणि N95 मास्क. या दोन्ही अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा प्रत्येक येणाऱ्या दिवसाबरोबर वाढवण्यात येणार असून त्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात भविष्यासाठीही सुनिश्चित केला गेला आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले गेले आहे की, ११२.७६ लाख N95 मास्क आणि १५७.३२ लाख PPE किट्सची ऑर्डर दिली गेली आहे. यात ८० लाख किटस पासून मास्क वेगळे बनवणार आहेत. अशाने मास्कची संख्या आणखी वाढेल. सरकारने सांगितले की, सध्या पर्याप्त प्रमाणात किटस आणि मास्क उपलब्ध आहेत आणि प्रत्येक आठवड्याला १० लाख पीपीई किटसचा पुरवठा करण्याचे टार्गेट ठेवले आहे.

चीनकडून आले PPE किटस
वैद्यकीय किट वेळेवर पुरवठ्यासाठी सरकार आपल्या देशात उपकरणे तयार करत असताना परदेशातूनही आयात केली जात आहे. आयातीची पहिली खेप चीनकडून आली आहे. ६ एप्रिलला सरकारला चीनकडून १.७० लाख पीपीईची खेप मिळाली असून २० हजार पीपीई किट फक्त भारतात तयार केल्या आहेत. म्हणजेच १.९० पीपीई किट सध्या तयार आहेत जे रुग्णालयांमध्ये वितरीत केले जातील. या किट्सशिवाय देशात आधीच ३,८७,४७३ पीपीई किटस आहेत. अशा प्रकारे सध्या देशात एकूण ५,७७,४७३ पीपीई किटस उपलब्ध आहेत. चीनमधील ६० लाख पीपीई किटसह आणखी एक करार देखील अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

११ एप्रिल पासून येणार सिंगापूरचा पुरवठा
सरकारला चीनकडून पीपीई किट मिळाली आहे, तर सिंगापूरमध्ये ८० लाख पीपीई किट (मास्कसह) ची ऑर्डर दिली गेली आहे. ११ एप्रिलपासून ८० लाख किटची डिलिव्हरी सुरू होईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. पहिल्या तुकडीत २ लाख किट येणार असून आठवड्यात ८ लाख किट आणखी येणार आहेत.

भारतात दररोज ८० हजर मास्कचे टार्गेट
भारतात सध्या पीपीई किटस उत्तर रेल्वेकडून तयार केले जात आहेत. DRDO ने देखील मास्क आणि किटस बनवले आहेत. आता भारत प्रोडक्शन वाढवत आहे. सरकारचे म्हणणे आहे की, दररोज ८० हजार मास्क बनवायचे टार्गेट ठेवले आहे.

कोरोना युद्धात आतापर्यंत काय झाले ?
केंद्र सरकारकडून आतापर्यंत २० लाखाहून अधिक N95 मास्क दिले आहेत. यापैकी रुग्णालयांव्यतिरिक्त देशाच्या विविध भागात सुमारे १६ लाख मास्क उपलब्ध केले आहेत. म्हणजेच हे मास्क गरजूंना पोचले आहेत. तर सुमारे ६ लाख पीपीई किटसुद्धा पुरवल्या आहेत.

त्याच बरोबर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे ICMR नुसार, ६ एप्रिल रोजी रात्री ९ पर्यंत देशभरात एकूण १,०१,०६८ लाख सॅम्पल टेस्ट घेतले गेले आहेत. त्यापैकी ४१३५ लोकांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेपर्यंत एका दिवसात ११,४३२ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी ३११ पॉजिटीव्ह आढळले आहेत.