‘त्या’ बॅगेत सापडलेले अर्भकांचे मृतदेह नसून वैद्यकीय कचरा

कोलकत्ता : वृत्तसंस्था

एका प्लास्टीक बॅगेत कोलकत्ता पोलीसांना कुजलेल्या अवस्थेत १४ बालक व अर्भक मृतदेह सापडले होते. या घटनेमुळे कोलकत्तामध्ये एकच खळबळ उडाली होती. हा बॅग रविवारी आढळून आली होती. मात्र, डॉक्टरांच्या तपासणी नंतर हे अर्भक किंवा बालकांचे मृतदेह नसून वैद्यकीय कचरा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

[amazon_link asins=’B009M4MDW8,B075XHDX96′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f237cca5-af69-11e8-826d-b340b16409bf’]

रविवारी सापडलेल्या या बॅगेची सखोल चौकशी करण्याचे आदेश स्थानिक महापौरांनी दिले होते. त्यानुसार, ही बॅग तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. यावर डॉक्टरांनी तपासणी करुन ही अर्भक नसुन वैद्यकीय कचरा असल्याचे स्पष्ट केले.

जाहीरात

रविवारी मिळालेल्या बॅगमुळे मोठे मासे गळाला लागतील असे पोलिसांना वाटले होते. पण, हे अर्भक नसुन वैद्यकीय कचरा असल्याचे आता स्पष्ट स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांनी ह्या मध्ये मानवी पेशी आढळल्या आहेत. पण, बॅगेत सापडलेले नेमके काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहीरात