Medications Available Without A Prescription | आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार औषधे; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Medications Available Without A Prescription | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) काही निवडक औषधांचा समावेश ‘ओव्हर द काऊंटर’ यादीत (Over The Counter list) केला आहे. त्यामुळे आता ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय (Medications Available Without A Prescription) घेता येणार आहेत. या निर्णयामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठी मदत होणार असून औषधांच्या दुकानातील वैद्यकीय प्रतिनिधी म्हणजेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कडून (Medical Representative) अधिकृतरीत्या या औषधांचे वितरण करण्यात येणार आहे.

 

केंद्र सरकारने औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या (Medicines and Cosmetics Act 1940) उपकलम (1) आणि कलम 12 नुसार हा निर्णय घेत नुकतीच अधिसूचना जाहीर केली. तसेच या निर्णयासंदर्भात नागरिकांच्या हरकती आणि सूचनाही ऐकूण घेण्यात येणार आहेत. या औषधांमध्ये पॅरासिटामॉल (Paracetamol), अँटी इन्फेक्शन (Anti Infection) आणि अँटी फंगल (Anti Fungal), अँटीसेप्टिक (Antiseptic), माऊथवॉश (Mouthwash), काही मलम (Ointment) इत्यादींचाही समावेश आहे. मात्र दिवस पुरेल एवढीच औषधे मिळणार आहे. जर औषधे घेऊनही रुग्णाला आराम मिळाला नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या निर्णयाचा ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वाधिक दिलासा मिळाला आहे. (Medications Available Without A Prescription)

ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनचे (All Food and Drug License Holders Foundation) अध्यक्ष अभय पांडे (Abhay Pandey) म्हणाले, “आपत्कालीन स्थितीत किंवा अन्य प्रसंगात अनेक वेळा प्रिस्क्रिप्शन साठी ताटकळत राहावे लागते, हे सुद्धा टळण्यास मदत होईल.’

 

‘ही’ औषधे मिळणार –
पोविडोन आयोडीन (Povidone iodine), क्लोरहेक्सिडिन माऊथवॉश (Chlorhexidine Mouthwash),
क्लोट्रिमेज़ोल क्रीम (Clotrimazole Cream), क्लोट्रिमेज़ोल डस्टिंग पावडर (Clotrimazole Dusting Powder),
डेक्स्ट्रोमेथोर्फन हायड्रो ब्रोमाइड लोजेंजेस (Dextromethorphan Hydrobromide Lozenges), डायक्लोफेनॅक ऑइंटमेंट क्रीम जेल (Diclofenac Ointment Cream Gel), डायफेनहाइड्रामाईन कॅप्सूल (Diphenhydramine Capsules), पॅरासिटामॉल गोळ्या (Paracetamol Tablets), सोडियम क्लोराईड नेझल स्प्रे (Sodium Chloride Nasal Spray), नेजल डिकंजस्टेन्ट (Nasal Decongestant), केटोकोनाझोल शाम्पू (Ketoconazole Shampoo), लॅक्टुलोज सोल्युशन (Lactulose Solution), बेंजोईल पॅरॉक्साईड (Benzoyl Peroxide), कॅलामाईन लोशन (Calamine Lotion), जायलोमेटाजोलिन हायड्रोक्लोराईड (Xylometazoline Hydrochloride) आणि बिसाकोडाईल गोळ्या (Bisacodyl Tablets).

 

Web Title :- Medications Available Without A Prescription | medications available without a prescription

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा