Medicine Price Hike | रुग्णांना बसणार महागाईची झळ, औषधांच्या किंमती सुमारे 40 टक्क्यांनी महागल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंधन दरवाढीने (Fuel price hike) सगळ्याच वस्तू महाग झाल्या आहेत आणि त्याला औषधंही (Medicine Price Hike) अपवाद नाहीत. हृदयरोग (heart disease) आणि मधुमेहावरील (diabetes) औषधांच्या (Medicine Price Hike) किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच प्रतिजैविक औषधे तसंच टॉनिक (Tonic) आणि खोकल्याच्या (cough) औषधांच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे.

 

कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक पुरवठा साखळीत अडथळा आला आहे. त्यामुळे भारतात पॅरासिटामॉलसह (Paracetamol) पेनकिलर, अँटीइन्फेक्टीव्ह, कार्डियाक आणि अँटीबायोटिक्ससह अत्यावशक औषधांच्या किंमती 40 टक्क्यांनी वाढल्या (Medicine Price Hike) आहेत. ज्याला औषध क्षेत्रात सक्रिय फार्मास्युटिकल घटक किंवा API असे म्हटले जाते. त्याच्या किंमतीत वाढ झाल्याने औषधे महागली आहेत. ही औषधांची महागाई इतक्यात आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत.

 

यामुळे वाढल्या किंमती

कोरोनामुळे औषध निर्मितीसाठी अत्यावश्यक असलेला कच्चा मालाच्या (raw material) पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक औषधांच्या कच्चा मालाच्या किंमतीत सरासरी 50 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. काही घटकांची वाढ 140 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. मागील 20 वर्षात औषधांच्या किंमतीत एवढी भरमसाठ (Medicine Price Hike) वाढ कधीही झाली नसल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.

 

कोणत्या गोळ्या महागल्या

रक्तदाबाची गोळी पूर्वी दहा गोळ्यांची एक स्ट्रीपची किंमत 172 रुपये होती. ती आता 190 रुपये झाली आहे. मधुमेहाची एक स्ट्रीप 11 रुपये 30 पैशाला होती. ती आता 18 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. अँटासिड च्या 15 गोळ्याची किंमत पूर्वी 24 रुपये होती. ती आता 37 रुपये झाली आहे. झंडू बाम 35 रुपयांना होता. आता तो 40 रुपयांना मिळणार आहे. विक्स इनहेलर आधी 50 रुपयांना मिळत होते. ते आता 59 रुपयांना मिळणार आहे.

 

खोकल्याच्या एका बॉटलची किंमत सहा महिन्यात 40 ते 50 रुपयांनी वाढली आहे.
डेटॉलची 105 रुपयांची बॉटल आता 116 रुपयांना मिळणार आहे.
कॅल्शियम गोळ्यांच्या (Calcium tablet) किंमती 99 वरुन 110 रुपये झाली आहे.
त्वचा रोगावर चालणारे औषध 37 रुपयांना होते, ते आता 46 रुपयांना मिळणार आहे.

 

Web Title :- Medicine Price Hike | medicine price hike patients will hit by inflation with drug prices rising by 40 per cent

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा