आंब्याच्या पानांमध्ये आहेत औषधी गुणधर्म

पोलीसनाम ऑनलाइन- आंबा हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे कठीणच. उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात आंबे विक्रीसाठी येत असतात. परंतु, या आंब्याची पाने सुद्धा खूपच उपयोगी आहेत. यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. मधुमेहावर ही पाने लाभदायक असल्याचे तज्ज्ञ सांगातात. आंब्याच्या पानामुळे मधुमेही रुग्णांच्या समस्या दूर होऊ शकतात. मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आंब्याच्या ताज्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहू शकातो.

सुजलेल्या हिरड्यांवर उपचार करण्यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकळून घेऊन पाणी थंड करावे. हे पाणी थंड झाल्यानंतर त्याने चूळ भरल्यास हिरड्या निरोगी राहतात. आंब्याच्या पानात अँट-इन्फ्लेमेटरी आणि टॉनिक गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे हिरड्यांची सूज आणि हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव कमी होतो. शिवाय उच्च रक्तदाबावरही आंब्याची पाने गुणकारी असून त्याचा वापर पूर्वीपासून होत आहे. आंब्याच्या पानात असे गुणधर्म आहेत जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. आंब्याच्या पानामुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात. व्हेरिकोज वेनिसच्या समस्येवरही आंब्याची पाने लाभदायक आहेत. श्वसनसंबंधीचे आजार दूर ठेवण्यासाठी चहामध्ये आंब्याची पाने उकळून तो चहा प्यावा.

यामुळे अस्थमासारखे आजार दूर होऊ शकतात. सर्दी, खोकला, घसादुखी यांसारख्या समस्यांवर सर्वसामान्य उपचार म्हणून आंब्याची पाने गुणकारी आहेत. आंब्याच्या पानाच्या सेवनाने किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते. तसेच जुलाब लागल्यास आंब्याच्या पानांची पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून हे पाणी दिवसातून तीनवेळा प्यायल्यास जुलाब थांबतात. भाजण्यावरही आंब्याची पाने गुणकारी आहेत. त्वचा भाजल्यास आंब्याची पाने जाळून त्याची राख त्वचेवर पूर्वी लावली जात असे. आंब्याच्या पानाचा चहा बनवून तो थोडा थंड करून भाजलेली त्वचा या पाण्याने स्वच्छ केली जाते. यामुळे त्वचेला तात्पुरता आराम मिळतो. परंतु , यानंतर डॉक्टरांकडे गेले पाहिजे.